agrowon news in marathi, prime minister modi says, every man had contributed in country development, Maharashtra | Agrowon

विकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान : पंतप्रधान मोदी
वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल घडविण्याच्या उद्देशाने आम्ही प्रवासाला सुरुवात केली. या चार वर्षांमध्ये विकासाला एका चळवळीचे रुप प्राप्त झाले. भारताच्या या विकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे मोलाचे योगदान आहे. सरकारवर विश्वास दाखवणाऱ्या जनतेसमोर मी नतमस्तक होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या.

नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल घडविण्याच्या उद्देशाने आम्ही प्रवासाला सुरुवात केली. या चार वर्षांमध्ये विकासाला एका चळवळीचे रुप प्राप्त झाले. भारताच्या या विकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे मोलाचे योगदान आहे. सरकारवर विश्वास दाखवणाऱ्या जनतेसमोर मी नतमस्तक होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या.

केंद्रातील मोदी सरकारला शनिवारी (ता. २६) चार वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासीयांचे आभार मानले. ते म्हणाले, की २०१४ मध्ये याच दिवशी आम्ही भारतात बदल घडवण्यासाठी कामाला सुरुवात केली. गेल्या चार वर्षांत विकासाला एका चळवळीचे रुप प्राप्त झाले. प्रत्येक भारतीयाने या विकास यात्रेत योगदान दिले. १२५ कोटी भारतीयांनी भारताला नव्या उंचीवर नेले. मोदी सरकारवर विश्वास दाखवणाऱ्या देशवासीयांसमोर मी नतमस्तक होतो. तुमचा पाठिंबा आणि प्रेम यामुळे आम्हाला प्रोत्साहन आणि शक्ती मिळते. आम्ही यापुढेही अशाच पद्धतीने जनतेची सेवा करत राहू. 

अर्थव्यवस्था सुधारली ः जेटली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, की गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील उत्तम सरकार आणि उत्तम अर्थकारण व चांगले राजकारण यांच्या एकत्रित मिश्रणामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारली. एकेकाळी भारत फ्रॅजाइल फाइव्ह (नाजूक अर्थव्यवस्था असणारे पाच देश) यादीतून जगभरात ब्राइट स्पॉट म्हणजे लखलखता तारा म्हणून आता ओळखला जातो. फेसबुकवर त्यांनी यावर भाष्य करणारा ब्लॉग लिहिला आहे. मुद्रा योजना, पीकविमा योजना आणि ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी दिलेल्या निधीबाबतही यांनी लिहलं आहे. पायाभूत सुविधांच्या विकासावर या वर्षात 134 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

चार वर्षांत केवळ अपयशी 
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या, की मोदी सरकारची ही चार वर्षे अत्यंत निराशाजनक होती. भाजपच्या काही सहकारी पक्षांनी त्यांची सोडलेली साथ हे त्याचेच निदर्शक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली प्रत्येक गोष्ट ऐतिहासिक ठरली आहे, त्यात इंधन दरवाढ, दलितांवरील अत्याचार, बेरोजगारी आणि गरिबी ऐतिहासिक पातळीवर पोचली आहे. केंद्रातील सरकार सर्वच पातळ्यांवर अयशस्वी ठरले आहे.

अनागोंदीची चार वर्षे
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले, की मोदी सरकारची चार वर्षे म्हणजे राजकारणात भ्रष्टाचार, बॅंक यंत्रणेत अपयश, इंधन दरवाढ, रुपयाचे अवमूल्यन, देशाचा पैसा बाहेर पळवून नेणे, जीएसटीमुळे महागाई वाढ, दलितांवर अत्याचार, बेरोजगारी आणि व्यापाऱ्यांवर अन्याय या गोष्टींनी भरलेली आहेत.

 

कृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या 
क्षेत्रात मोदी नापास ः राहुल गांधी

मागील चार वर्षांत मोदी सरकार महत्त्वाच्या सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. केवळ घोषणा, स्वतःची प्रतिमा आणि योगा यामध्येच त्यांनी विकास केल्याचे ट्विट कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. या ट्विटमध्ये कृषी विकास, परराष्ट्र धोरण, इंधनाच्या किमती, रोजगाराच्या संधी या सर्वच क्षेत्रात मोदी सरकार (F फेल) अपयशी ठरले आहे. मात्र, घोषणा, स्वः प्रतिमा यांच्यात (A+) तर योगा (B-) एवढ्याच बाबींचा विकास झाल्याचे राहुल गांधी म्हणले. मोदी हे बोलण्यातच मास्टर असून, जटील समस्या सोडविण्यात अडखळत आहेत, असेही ते म्हणाले.

चार वर्षांचे प्रगतिपुस्तक     

कृषी     नापास
परराष्ट्र धोरण   नापास
इंधन दर   नापास
रोजगार निर्मिती  नापास
घोषणा ए (+)
स्वः प्रतिमा   ए (+)
योगा  बी (-)

काँग्रेसचा विश्वासघात दिवस
केंद्रातील भाजप सरकारला शनिवारी (ता. २६) चार वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने भाजपकडून वर्षपूर्ती साजरी केली जात आहे. मात्र, भाजपने निवडणुकीच्या काळात २०१४ मध्ये दिलेली आश्वासने चार वर्षांत पूर्ण केली नाही. केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी, गरीब जणतेचा विश्वासघात केला, अशी टीका करत काँग्रेसने हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून साजरा केला. शनिवारी काँग्रेसने देशभरात आंदोलन केले. काँग्रेसने विविध ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. या वेळी इंधन दरवाढ, बेरोजगारी, महागाई आणि गरिबीवर सरकारला नियंत्रण अणण्यात अपयश आल्याची टीका काँग्रेसने केली. कुठे महिलांनी सायकल रिक्षा चालवत तर चुलीवर स्वयंपाक करत इंधन दरवाढीचा निषेध केला, तर अनेक ठिकाणी मोर्चा, रास्ता रोको, धरणे आणि निदर्शने करण्यात आली.

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...