agrowon news in marathi, Prizes from block and ward for gramswachhta abhiyan, Maharashtra | Agrowon

ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून आता बक्षिसे
सुर्यकांत नेटके
मंगळवार, 22 मे 2018

नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी वाढवण्यासाठी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आता तालुक्‍याऐवजी ग्रामपंचायत प्रभाग व जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतीत राबवले जाणार आहे. याशिवाय राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ पंचायत समिती व स्वच्छ जिल्हा परिषद स्पर्धाही राबवली जाणार आहे. जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर ग्रामपंचायतीचा गौरव होईल. बक्षिसाच्या रकमेतही मोठी वाढ केली आहे.

नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी वाढवण्यासाठी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आता तालुक्‍याऐवजी ग्रामपंचायत प्रभाग व जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतीत राबवले जाणार आहे. याशिवाय राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ पंचायत समिती व स्वच्छ जिल्हा परिषद स्पर्धाही राबवली जाणार आहे. जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर ग्रामपंचायतीचा गौरव होईल. बक्षिसाच्या रकमेतही मोठी वाढ केली आहे.

राज्यातील संपूर्ण गावांत शौचालयाची कामे पूर्ण झाली असल्याचा दावा करत राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा झाली आहे. असे असले तरी शौचालयाच्या व्यतिरिक्त अन्य बाबीसाठी गावांनी, ग्रामपंचायतींनी सक्रिय राहण्यासाठी ‘संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्छता अभियान’ राबवले जात आहे. अभियानात आता काहीसे बदल केले आहे. तालुका पातळीएवजी जिल्हा परिषद गटनिहाय एका ग्रामपंचायतीला बक्षीस मिळेल. याशिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीमधील एका प्रभागालाही बक्षीस मिळेल.

अभियानाला १ मे पासून सुरवात होईल. २ आक्‍टोबरला राज्य पातळीवर बक्षीस वितरण होईल. जिल्हा परिषद पंचायत समितीला बक्षिसासाठी तपासणी समिती ३० गुणांवर, प्रभागासाठी शंभर गुणांवर आणि ग्रामपंचायतीसाठी दोनशे गुणांची निकष असेल. १६ ते ३१ मे या कालावधीत ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायती सहभाग निश्‍चित करतील. नगर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी सहभाग घेण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे.

बक्षिसासाठी महत्त्वाच्या बाबी

 • चालू व बंद पाणीपुरवठा योजना
 • पाणीपट्टी वसुली
 • पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन
 • शौचालयाचे बांधकाम व प्रत्यक्ष वापर,
 • सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन व शौचालय व्यवस्थापन
 • वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता
 • वैयक्तिक व सार्वजनिक विकासात सहभाग

यशवंतराव चव्हाण पारितोषिक बंदच
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू झाल्यानंतर अभियानात लोकांचा सहभाग वाढावा आणि अभियानाला व्यापक प्रसिद्धी मिळावी, यासाठी लेखन करणाऱ्या पत्रकारांना स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती पारितोषिक सुरू केले होते. जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर ते दिले जाई. चार वर्षांपूर्वी अभियानात बदल करताना मात्र हे पारितोषिक बंद केले. अभियानात नव्याने बदल केले मात्र पारितोषिकाचा मात्र कुठेही उल्लेख नाही.

अशी आहेत बक्षिसे

 •  उत्कृष्ट प्रभाग ः १० हजार रुपये
 •  उत्कृष्ट जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत ः ५० हजार रुपये
 •  उत्कृष्ट पंचायत समिती ः प्रथम ः ५० लाख, द्वितीय ः ३० लाख, तृतीय ः २० लाख
 •  उत्कृष्ट जिल्हा परिषद ः प्रथम ः १ कोटी, द्वितीय ः ७५ लाख, तृतीय ः ५० लाख
 •  ग्रामपंचायतीला दिली जाणारी बक्षीसे
 •  जिल्हा ः प्रथम ५ लाख, द्वितीय ३ लाख व तृतीय दोन लाख
 •  विभाग ः प्रथम १० लाख, द्वितीय ८ लाख, तृतीय ः ६ लाख
 •  राज्य ः प्रथम २५ लाख, द्वितीय ः २० लाख, तृतीय ः १५ लाख

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...