agrowon news in marathi, progress in monsoon after Saturday, Maharashtra | Agrowon

माॅन्सूनची प्रगती शनिवारनंतर ?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

मेडन-जुलियन ऑसोलेशन (एमजेओ) ही विषुववृत्तीय हिंदी महासागरातील घटक असून, त्याचा ‘एल निनो’, ‘ला निनो’, ‘आयओडी’प्रमाणे मॉन्सूनवर परिणाम होतो. ‘एमजेअाे’ वर्षभर आठ कक्षांमध्ये फिरत असतो. ‘एमजेओ’ सक्रिय असलेल्या स्थानावरून मॉन्सून सक्रिय असेल की नसेल हे समजते. गेले काही दिवस हा ‘एमजेओ’ प्रतिकूल ठिकाणी असल्याने माॅन्सूनची वाटचालीवर परिणाम झाला होता. मात्र सध्या माॅन्सूनसाठी पोषक ‘एमजेओ’ सक्रिय होण्याच्या स्थितीमध्ये आहे. 
- डॉ. के. एस. होसळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हवामान विभाग

पुणे : जवळपास आठवडाभरापासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती थांबल्याने राज्याच्या अनेक भागांत पावसाने जोर धरलेला नाही. विषुववृत्ताकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह सुरळीत होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होऊ लागल्याने शनिवारनंतर (ता. २३) महाराष्ट्रासह देशाच्या पूर्व भागात मॉन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

विषुववृत्ताकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी होणे, माॅन्सूनच्या वाटचालीसाठी आवश्‍यक ‘मेडन जुलिअन ऑस्सिलेशन’ (एमजेओ)ची प्रतिकूल स्थिती, मध्य आणि पूर्व प्रशांत महासागर, पश्‍चिम गोलार्ध, आफ्रिकेलगत पूर्वेकडे जाणारे प्रवाह, वायव्य प्रशांत महासागरात हवेचे कमी झालेले दाब यामुळे मॉन्सूनवर परिणाम झाला. वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्याने मॉन्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल ११ जूनपासून जैसे थे आहे.

विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात ११ जून रोजी मॉन्सून दाखल झाला. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ९ जूनपासून कोणतीही प्रगती झालेली नाही. तर देशाच्या पूर्व भागातही १२ जूननंतर मॉन्सूनने आणखी वाटचाल केलेली नाही.
शुक्रवारपर्यंत (ता. २२) ‘एमजेओ’ची स्थिती पश्‍चिम विषुववृत्तीय हिंद महासागर व लगतच्या अरबी समुद्रामध्ये सक्रिय होण्याची, तसेच पूर्व भारतामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊन, पूर्वेकडील वाऱ्यांचे प्रवाह वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे रविवारपर्यंत (ता. २४) मॉन्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. २३ ते २५ जूनच्या दरम्यान आसाम, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, झारखंड, बिहार मध्य प्रदेशात मॉन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...