agrowon news in marathi, Raghunathdada Patil says, all farm produce need to free from regulation, Maharashtra | Agrowon

सर्वच शेतमाल नियंत्रणमुक्त करण्याची गरज ः रघुनाथदादा पाटील
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जून 2018

पुणे ः फळे भाजीपाला नियमनमुक्त केल्यामुळे शेतमाल विक्रीसाठी शेतकरी आता गावातून शहारांमध्ये येऊ लागला आहे. यामुळे शेतमालाला थेट ग्राहक मिळून ५० टक्क्यांपेक्षा अधिकचा फायदा शेतकऱ्याला मिळत आहे. हे आठवडे बाजाराने सिद्ध करून दाखविले आहे. असेच सर्वच शेतमाल नियंत्रणमुक्त करून निर्यातबंदी कायमची हटविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.

पुणे ः फळे भाजीपाला नियमनमुक्त केल्यामुळे शेतमाल विक्रीसाठी शेतकरी आता गावातून शहारांमध्ये येऊ लागला आहे. यामुळे शेतमालाला थेट ग्राहक मिळून ५० टक्क्यांपेक्षा अधिकचा फायदा शेतकऱ्याला मिळत आहे. हे आठवडे बाजाराने सिद्ध करून दाखविले आहे. असेच सर्वच शेतमाल नियंत्रणमुक्त करून निर्यातबंदी कायमची हटविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.

शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री याेजनेअंतर्गत कृषी पणन मंडळाच्या वतीने आयाेजित स्वामी समर्थ शेतकरी आठवडे बाजाराचा चाैथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रविवारी (ता. २४) आयाेजित कार्यक्रमात श्री. पाटील बाेलत हाेते.

या वेळी ज्येष्ठ समाजवादी नेते डाॅ. कुमार सप्तर्षी, कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, आत्माचे संचालक सुभाष खेमनर, कृषी संचालक प्रल्हाद पाेकळे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशाक बी. जे. देशमुख, भारत विकास ग्रुपचे संचालक हणमंत गायकवाड, माजी कृषी संचालक द. श्री. व्यवहारे, स्वामी सर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक नरेंद्र पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थित हाेते.

श्री. पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्याची मागणी स्व. शरद जाेशी यांनी ४० वर्षांपूर्वीच मांडली आहे. या मागणीची आता अंमलबजावणी हाेऊ लागली असून, सरकार विविध अनुदानातून खते, बियाणे, तंत्रज्ञानाच्या घाेषणा करतात. मात्र शेतकऱ्यांना अनुदान न देता त्याने पिकविलेल्या शेतमालाच्या घामाचे दाम दिले पाहिजे.

शेतमालाला भाव नसल्यानेच आत्महत्या वाढत आहेत. फळे भाजीपाला नियमनमुक्तीमुळे शेतकरी आता शहरांमध्ये मध्यस्थांशिवाय शेतमालाची विक्री करू लागला आहे. यामुळे जगाच्या पाठीवर जिथे जिथे शेतमालाला दर आहेत. त्याठिकाणी विक्रीसाठी नेण्यची हिंमत शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र जागतीक पातळीवर शेतमालाचे दर वाढले कि, सरकार निर्यात बंदी करते व शेतमालाचे दर काेसळतात. यासाठी शेतकरी विराेधी धाेरणे बदलून सर्वच शेतमाल नियंत्रण मुक्त करण्याची गरज आहे.

कृषी आयुक्त सिंग म्हणाले, की आठवडे बाजार यशस्वी पणे संचलन केल्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांमध्ये विश्‍वासाचे नाते निर्माण झाले आहे. आठवडे बाजारामुळे शेतकऱ्यांना आता दिवसभर शेतमाल विक्रीसाठी बसण्याची गरज नाही. सकाळी दाेन तासात शेतमाल विक्री करुन शेतकरी पुन्हा गावाला जाऊ शकताे. दर आठवडे बाजारात फिरल्यावर ग्राहकांनी देखील समाधान व्यक्त केल्याचे अनुभव मला आला आहे. अशाच प्रकारचे १० हजार आठवडे बाजारांचे जाळे राज्यात उभे करण्याची गरज आहे. यासाठी स्वामी समर्थ आठवडे बाजार आदर्श ठरला आहे. 

यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी, आत्माचे संचालक खेमनर, शेतमाल बाजारपेठेचे अभ्यासक दीपक चव्हाण, बी. जे. देशमुख यांनी मनाेगत व्यक्त केले.

विषमुक्त शेतमालाची मांडणी चुकीच्या पद्धतीनेे
विषमुक्त शेतमालाची मांडणी चुकीच्या पद्धतीने आणि भरल्या पााेटाने मांडण्यात येत असल्याची टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली. १९६० नंतर युरीया आणि इतर खतांचा वापर सुरू झाला. याअगाेदरची शेती हि सेंद्रिय शेतीच हाेती. मात्र वाढती लाेकसंख्येचा विचार करता शेतमालाच्या उत्पादनवाढीची गरजेतून तंत्रज्ञान आहे. खतांच्या वापरांमुळे सर्वांनाच कर्कराेग झाला असता आणि भारताची लाेकसंख्या १२५ काेटी झाली नसती. कृषी अधिकारी आणि काही जणांकडून विषमुक्त शेतमालाची मांडणी चुकीच्या पद्धतीने हाेत असून, शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे स्वांतत्र्य हवे.’’

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...