agrowon news in marathi, Rain become weak in state, Maharashtra | Agrowon

पावसाचा जोर आेसरला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 जुलै 2018

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी (ता. १८) आेसरला. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडत अाहेत. अाज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पावसाचा जोर ओसरणार आहे, तर मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी (ता. १८) आेसरला. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडत अाहेत. अाज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पावसाचा जोर ओसरणार आहे, तर मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राने माॅन्सूनला बळकटी दिल्याने गेले काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टी झाली. मात्र, कमी दाब क्षेत्र जमिनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील पावसाचा जोर ओसरला. पश्‍चिम विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसभर ऊन- सावल्यांचा खेळ सुरू होता. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरीही येत होत्या. 

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. साताऱ्यातील लामज येथे २२७ मिलिमीटर, तर रत्नागिरी जिल्ह्यातील विलवडे येथे २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा पुरवठा होत असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  

बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग)

कोकण : डोलखांब ८३, खोपोली ८४, पोलादपूर ७०, कोंडवी ७८, खेरडी ९७, मार्गतम्हाणे ८५, रामपूर ८०, वाहल ७२, कळकावणे ११०, शिरगाव १२७, वेलवी ७२, खेड ८१, अंबवली ७७, कुलवंडी ७२, धामनंद ७२, अबलोली ८०, फनसावणे ७७, अंगवली ७१, कोडगाव ८८, राजापूर ७५, सवंडल ८३, ओनी ९२, पाचल ७६, भांबेड ११०, विलवडे २०५, जव्हार ८४, साखर ८४, मोखडा ९६. 

मध्य महाराष्ट्र : नाशिक : उभेरठाणा ७५, सुरगाणा ७१, नाणशी ८५, इगतपुरी ८८, धारगाव १०१, पेठ ९८, वेळुंजे १२०, हर्सूल ७९, शेंडी १६०, मुठे ११४, काले ८६, कार्ला ११८, खडकाळा ७६, लोणावळा १३४, राजूर ८५, आंबवडे ८१, जावळी ७०, बामणोली ९५, हेळवाक १२४, मोरगिरी ८६, महाबळेश्‍वर १६५, तापोळा १८७, लामज २२७, बाजार १०९, कोतोली ८६, करंजफेन ८२, आंबा ९१, राधानगरी १२१, साळवण ११०, सिद्धनेर्ली ८५, आजरा ८२, गवसे १५२, चंदगड ७९, हेरे ७४.

मराठवाडा : सिंधी ३०, अर्धापूर २२, दाभड २१, हयातनगर २१. 

विदर्भ : वरूड ६५, पुसाळा ५३, वाठोदा ५०, राजुरा ४२, काटोल ३५, नाकडोंगरी ३०, शिवरा ४६, गाऱ्हा ६१, गंगाझारी ५१, रावणवाडी ५२, तिगाव ३६, ठाणेगाव ३५, गोरेगाव ५५, मोहाडी ३७, पुराडा ३०.

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....