agrowon news in marathi, Rain erosion in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात पावसाची उसंत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ३५ मंडळातंच काय तो तुरळक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ३५ मंडळातंच काय तो तुरळक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

२५ जूनपर्यंतच्या पावसाच्या नोंदीनुसार मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी ७ मंडळांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत २५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. ३३ मंडळांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत २५ ते ५० टक्‍के, ५० मंडळांत ५० ते ७५ टक्‍के, ७० मंडळांत ७५ ते १०० टक्‍के; तर २६१ मंडळांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील २० मंडळांत अपेक्षित पावसाच्या पुढे जाऊन पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील १४, परभणीतील ३०, हिंगोलीतील २३, नांदेडमधील ६०, बीडमधील ३६, लातूरमधील ५०; तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २८ मंडळांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत जास्त पाऊस पडल्याची नोंद आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील १४ मंडळांत १ ते १४ मिलिमीटर, जालना जिल्ह्यातील केवळ परतूर तालुक्‍यातील तीन मंडळांत २ ते ७ मिलिमीटर, बीड जिल्ह्यातील केवळ एका मंडळात दोन मिलिमीटर, लातूर जिल्ह्यातील चार मंडळांत २ ते १० मिलिमीटर; तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरा मंडळांत ३ ते १४ मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली. 
 

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...