agrowon news in marathi, rain in July 101 percent, and in August 94 percent, Maharashtra | Agrowon

जुलैमध्ये १०१ टक्के, ऑगस्टमध्ये ९४ टक्के पाऊस
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 31 मे 2018

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (माॅन्सून) हंगामात सर्वसाधारण म्हणजेच सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने बुधवारी (ता. ३०) जाहीर केला, तर मॉन्सून मिशन मॉडेलनुसार देशात १०२ टक्के पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात १०१ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९४ टक्के पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. यात ९ टक्क्यांची कमी/अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. महाराष्ट्रासह मध्य विभागात ९९ टक्के पावसाचा अंदाज आहे. 

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (माॅन्सून) हंगामात सर्वसाधारण म्हणजेच सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने बुधवारी (ता. ३०) जाहीर केला, तर मॉन्सून मिशन मॉडेलनुसार देशात १०२ टक्के पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात १०१ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९४ टक्के पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. यात ९ टक्क्यांची कमी/अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. महाराष्ट्रासह मध्य विभागात ९९ टक्के पावसाचा अंदाज आहे. 

हवामान विभागाने १६ एप्रिलला मॉन्सून हंगामाचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानंतर बुधवारी सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला. संपूर्ण हंगामात पडणारा पाऊस, जुलै, ऑगस्टमधील सरासरी पाऊस, तसेच चार भौगोलिक विभागांमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज देण्यात आला. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण पाऊस मानला जातो.

१९५१ ते २००० या कालाधीतील देशातील पावसाची सरासरी ८९० मिलिमीटर आहे. स्टॅटेस्टिकल एन्सेंबल फोरकास्टिंग सिस्टिम (एसइएफएस) मॉडेलनुसार देशात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ९७ टक्के पाऊस, तर मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्ट सिस्टिम (एमएमसीएफएस) या मॉडेलनुसार १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात चार टक्क्यांची तफावत गृहीत धरण्यात आली आहे. 

गतवर्षीच्या अखेरच्या टप्प्यात प्रशांत महासागरात विषूववृत्तीय भागात सुमद्राचे तापमान कमी झाल्याने मध्यम ‘ला-निना’ स्थिती निर्माण झाली होती. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक माॅडेलच्या अभ्यासानुसार यंदाच्या मॉन्सून काळात प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानाची स्थिती सर्वसाधारण राहणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात या भागात तापमान वाढून ‘सौम्य एल-निनो’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढलेले अाहे. इंडियन ओशन डायपोलची (आयओडी) स्थिती सर्वसाधारण असून, मॉन्सूनच्या मध्यात ती नकारात्मक पातळीवर जाण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.    

सरासरीइतक्या पावसाची शक्यता अधिक
हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार यंदा सरासरी इतका पाऊस (९६ ते १०४ टक्के) पडण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ४३ टक्के आहे. मॉन्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी (९० ते ९६ टक्के) पावसाची शक्यता २८ टक्के, सरासरीपेक्षा अपुऱ्या (९० टक्क्यांपेक्षा कमी) पावसाची १३ टक्के, सरासरीपेक्षा अधिक (१०४ ते ११० टक्के) पावसाची शक्यता १३ टक्के, तर सरासरीपेक्षा जास्त (११० टक्क्यांपेक्षा अधिक) पावसाची शक्यता अवघी ३ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

   चार भौगोलिक हवामान विभागाचा अंदाज

  •  वायव्य विभाग : १०० टक्के
  •  मध्य विभाग : ९९ टक्के
  •  दक्षिण विभाग : ९५ टक्के 
  •  ईशान्य विभाग : ९३ टक्के 
     

इतर अॅग्रो विशेष
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...