agrowon news in marathi, rain in Karnataka, tamilnadu, Kerala, Maharashtra | Agrowon

कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीपमध्ये पावसाची हजेरी
वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

नवी दिल्ली : मॉन्सूनच्या वाटचालीचा वेग कमी झाला असला, तरी देशातील अनेक भागांत पाऊस सुररू आहे. शनिवारी (ता. १६) कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, त्रिपुरा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. कर्नाटकचा किनारी भाग, त्रिपुरा आणि केरळमध्ये पावसाचा जोर जास्त होता.

नवी दिल्ली : मॉन्सूनच्या वाटचालीचा वेग कमी झाला असला, तरी देशातील अनेक भागांत पाऊस सुररू आहे. शनिवारी (ता. १६) कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, त्रिपुरा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. कर्नाटकचा किनारी भाग, त्रिपुरा आणि केरळमध्ये पावसाचा जोर जास्त होता.

केरळमध्ये मागील सहा दिवस पावसाचा जोर होता. त्यामुळे अनेक भागांत पूर, दरडी कोसळणे, भूस्खलन यामुळे २५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्रिपुरातही पूरस्थिती आता कमी झाली असून, येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. येथे पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. शनिवारी कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, त्रिपुरा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. 

उत्तर प्रदेशमध्ये येत्या दोन दिवसांत वादळाचा तडाखा बसणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहगडमध्ये सर्वांत उच्चांकी ४३.७ तापमानाची नोंद झाली आहे. तसेच, बुधवारी आलेल्या या वादळात १५ जणांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले.

त्यानंतर आता येत्या दोन दिवसांत उत्तर प्रदेशच्या काही भागांत मोठ्या वादळाचा तडाखा बसणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला. यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १७ जणांचा मृत्यू झाला; तर ११ जण जखमी झाले. तसेच, यादरम्यान झाडे आणि घरांची मोठी पडझड झाली होती.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...