agrowon news in marathi, rain in Karnatka and madhya pradesh, Maharashtra | Agrowon

कर्नाटकचा किनारी भाग, मध्य प्रदेशात दमदार पाऊस
वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

नवी दिल्ली ः माॅन्सूनने कर्नाटक, केरळ, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू ही राज्ये व्यापाल्यानंतर येथे पाऊस सुरू आहे. किनारी कर्नाटकचा भाग, दक्षिण आणि उत्तर कर्नाटक, केरळ आणि तेलंगण राज्यांत शनिवारी (ता. ९) अनेक भागांत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

नवी दिल्ली ः माॅन्सूनने कर्नाटक, केरळ, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू ही राज्ये व्यापाल्यानंतर येथे पाऊस सुरू आहे. किनारी कर्नाटकचा भाग, दक्षिण आणि उत्तर कर्नाटक, केरळ आणि तेलंगण राज्यांत शनिवारी (ता. ९) अनेक भागांत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

मॉन्सूनने केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेशचा सर्व भाग व्यापाल्यानंतर वरील भागात मार्गक्रमण सुरू केले आहे. शनिवारी केरळ, कर्नाटकचा किनारी भाग, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पाऊस झाला. तेलंगणच्या दक्षिण भागातही मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तसेच येणाऱ्या २४ तासांत किनारी कर्नाटक, दक्षिण कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे; तर उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणच्या अनेक भागांत, तर तमिळनाडू आणि रायसीमाच्या काही भागात पावासाचा इशारा देण्यात आला आहे.

कर्नाटकात मॉन्सून जोरदार बरसला. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. दक्षिहा कन्नडा जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दक्षिहा कन्नडा, उडपी आणि मंगलूरू या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे स्थानिक प्रशासनाने शाळा आणि काॅलेजेसला सुटी जाहीर केली होती. शहरांमधील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. धरणांच्या खोऱ्यांत पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली होती. पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये पाऊस
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तसेच, छत्तीसगडच्या बहुतांश भागांत मध्यम पाऊस, तर मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी मध्य प्रदेशच्या अनेक भागांत मध्यम ते हलका पाऊस झाला. पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला. मध्य प्रदेशच्या उमराई, सौसर, बरेली, नरसिंगपूर, छत्तरपूर, पुष्पजगड, जबलपूर, सेवनी, अलताई, अतनेर बेगमगंज, पाचमराही, सलवानी, उद्यपूर, मांडला, गूना, घनसोर आदी ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला.

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...