agrowon news in marathi, rain in Kokan and central maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर कायम
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 जुलै 2018

पुणे  ः कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी (ता. १२) कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील लामज येथे उच्चांकी १८६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून तात्मिणी, दावडी, डुंगरवाडी, भिरा, लोणावळा या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला. 

पुणे  ः कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी (ता. १२) कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील लामज येथे उच्चांकी १८६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून तात्मिणी, दावडी, डुंगरवाडी, भिरा, लोणावळा या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला. 

गुरुवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, नाशिकमधील काही भागात पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. कर्नाटक ते केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस पडत आहे.

येत्या सोमवार (ता. १६) पर्यंत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

कोकणात धुव्वाधार पाऊस
गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली आणि सावंतवाडी येथे १३६ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच माखजन ११२, फुंगुस ११०, तुलसानी ११७, माभले १०७, तेरहे ११८, कलकावणे १०५, सवंडल १०७, कोंडीया १२०, फोंडा १२९.२, सांगवे १०३, तालेरे ११३, कडवल १२४, तलवड १०० या ठिकाणी शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. उर्वरित भागातही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे भात लागवडीला वेग आला आहे.

मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस
मध्य महाराष्ट्रातील पश्चिमेकडील भागात पावसाचा जोर कायम आहे. पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे, नाले वाहू लागले असून धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला आहे. साताऱ्यातील महाबळेश्‍वर १३५.६, तापोळा १७५.६, लामज १८६, हेळबाक १२५, पुणे जिल्ह्यातील काले १४१, भोळावडे व आंबावडे १२८, कोल्हापुरातील आंबा १११, राधानगरी ९६, साळवण १२८, नाशिकमधील धारगाव येथे १३०, बोरगाव १२०, सुरगाणा १०४.२ मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे.

विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस
जून महिन्यात विदर्भात पावसाचा जोर काहीसा कमी होता. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून विदर्भात पावसाचा जोर वाढला होता. बुधवारी (ता. ११) विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती १०७.२, पाटण १०५.३ मिलिमीटर पाऊस पडला. तर यवतमाळमधील झरी येथे १०३ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच नागपूर, गोदिंया, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अमरावतीतील लोणी, यवतमाळमधील हिवरी, बाभूळगाव, सावर, जाडमोहा, दिग्रज, लोनबेहल, सावळी, वणी, पुनवट, शिंदोळा, कायार, रिसा, खडकडोह, मुकूटबन, मथार्जून, घाटंजी, वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम, भंडाऱ्यातील केरडी, चंद्रपूरातील घुगस कोपर्णा, गडचांदूर, गडचिरोलीतील जिमलगट्टा येथे जोरदार पाऊस पडला. खरिपातील पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे.

मराठवाड्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा
पावसाचा जून महिना उलटला तरी मराठवाड्यात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. येत्या चार-आठ दिवसांत जोरदार पाऊस पडला तर खरिपातील पिकांना जीवदान मिळणार आहे. मराठवाड्याला अजूनह जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. गुरुवारी सकाळपयर्यंत नांदेडमधील बोधडी, दहेली, माहूर, वानोळा, वाई या ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याची नोंद झाली. उर्वरित भागात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्नानाबाद, परभणी जिल्‍ह्यात ऊन सावल्याचा खेळ सुरू असून, काही भागात ढगाळ हवामान होते.

कोकण विभाग
ठाणे :
धसइ ७६, देहरी ७७, नयाहडी ६३, खर्डी ६९, डोलखांब ६०, गोरेगाव ६९.३, रायगड : तलोजे ५३, कर्जत ६७.३, कडाव ६७, कशेले ६६, वौशी ६९, महाड ६०, करंजवडी ६१, नाटे ६५, तुडील ८० माणगाव ५४, इंदापूर ५४, गोरेगाव ५२, लोनेरे ५२ निझामपूर ७४, कोंडवी ७७, वाकण ६०, तला ६४, रत्नागिरी : चिपळूण ८०, खेरडी ८५, रामपूर ५२, वाहल ८५, सावरडे ९६, असुरडे ९२, कलकावणे १०५, शिरगांव ८२, वाकवली ५७, पालगड ७८, खेड ५२, अंबवली ८४, तलवली ६६, पटपन्हाले ६२, अबलोली ८०, रत्नागिरी ५२, खेडशी ५६, फंसोप ५५, कोटवडे ६१, टरवल ८०, पाली ५२, कडवी ९२, मुरडव ८०, माखजन ११२, फुंगुस ११०, फनसावणे ७६, अंगवली ९८, कोडगाव ८२, देवली ७५, देवरुख ७५, तुलसानी ११७, माभले १०७, तेरहे ११८, राजापूर ८४, सवंडल १०७, कोंडीया १२०, जैतापूर ७६, कुमभवडे ८७, नाटे ६५, ओनी ७५, पाचल ९८ लांजा ९८, भांबेड १०६, पुनस ९५, सातवली ५१, विलवडे ८५ सिंधुदुर्ग : देवगड ४७, मीतबंब ६८, बापरडे ७०, मालवण ६०, पेंडूर ९६, मासुरी ६२, श्रावण ९८, आचरा ६०, अमबेरी ७८, पोइप ७४, सावंतवाडी १३६, बांडा ९८, आजगाव ८०, अंबोली १३६, मदुरा ८८, वेंगुर्ला ८५, शिरोडा ६४, म्हापण ६८, वेटोरे ७८, कनकवली ८७, फोंडा १२९.२, सांगवे १०३, नांदगाव ९८, तालेरे ११३, वागडे ८१, कुडाळ ९८, कडवल १२४, कसाल ८८, वलवल ८७, मानगाव ९१, पिंगुली ९०, तालवट ९७, भेडशी ९८ पालघर ः वाडा ५९, कोणे ५३, कांचगड ५३, साइवन ५३.६, सफला ५१, जव्हार ६०, साखर १९४, मोखडा ५९, विक्रमगड ७९, तलवड १००,

मध्य महाराष्ट्र ः नाशिक : बोरगाव १२०, सुरगाणा १०४.२, नाणशी ६२, इगतपुरी ९६, घोटी ५०, धारगाव १३०, पेठ ९५, जागमोडी ७०.२, कोहोर ५४.६, त्र्यंबकेश्‍वर ५९, वेळुंजे ८०,
नगर : शेंडी ६१, पुणे ः काले १४१, भोळावडे व आंबावडे १२८, पौड ६५.०, मळे ६७.०, मुठे ८९.०, लोणावळा ५२.०, पानशेत ७६.०, सातारा : हेळवाक १२५, मोरगिरी ६७, महाबळेश्‍वर १३५.६, तापोळा १७५.६, लामज १८६. कोल्हापूर : काटोली ६७, करंजफेन ९३, आंबा १११, राधानगरी ९६, गगनबावडा ५४, साळवण १२८, पिंपळगाव ६०, कडेगाव ६०, कराडवाडी ९५, आजरा ५३,
गवसे ८०, चंदगड ६२, हेरे ७१,

मराठवाडा ः नांदेड : बोधडी ७३, दहेली १०७, माहूर ५५, वानोळा ६०, वाई ५३, सिंदखेड ६२

विदर्भ ः अमरावती : लोणी ९२, यवतमाळ : यवतमाळ ५३, हिवरी ५२, बाभूळगाव ६७, सावर ५६, जाडमोहा ५६, दिग्रज ५०, लोनबेहल ५६, सावळी ५२, वणी ७५, पुनवट ५७, शिंदोळा ८३, कायार ७७, रिसा ६१, शिरपूर ७४, झरी १०३, खडकडोह ७४, मुकुटबन १००, मथार्जून ७०, घाटंजी ६३, वर्धा : सेवाग्राम ५३. भंडारा : केरडी ५२. चंद्रपूर : घुगस ८२.२, कोपर्णा १०३, गडचांदूर ९५.६, जेवती १०७.२, पाटण १०५.३. गडचिरोली : जिमलगट्टा ६२.८,
 

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...