agrowon news in marathi, rain posibilities in state, Maharashtra | Agrowon

पावसाचा अंदाज; तापमानात घट शक्य
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 मे 2018

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होत आहे. बुधवारी (ता.३०) काेकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा; तर गुरुवारपासून (ता. ३१) मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा ताप कमी होऊन तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होत आहे. बुधवारी (ता.३०) काेकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा; तर गुरुवारपासून (ता. ३१) मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा ताप कमी होऊन तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी ठळक झाले होते. पश्‍चिम किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रावर दाट ढगांनी गर्दी केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात बुधवारी जोरदार वारे, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि किनारपट्टीलगत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, ताशी ६० किलोमीटर वेगाने वाऱ्याचे झाेत येणार आहेत. त्यामुळे उंच लाटा उसळून समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

गुरुवारपासून (ता.३१) राज्यात सर्वदूर हलक्या पावसाचा अंदाज असून, शुक्रवारपासून कोकणात पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून, अकोला येथे उच्चांकी ४६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली. अमरावती, वर्धा येथे तापमान ४६ अंशांच्या पुढे; तर ब्रह्मपुरी, चंद्रपूर, यवतमाळ येथे पारा ४५ अंशांच्या पुढे आहे. उत्तर महाराष्ट्रातील येथेही तापमान ४५ अंशांवर गेले आहे. राज्यात ढगाळ हवामान, जोरदार वारे यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी (ता.२९) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६, नगर ४३.१, जळगाव ४५.०, कोल्हापूर ३७.४, महाबळेश्वर ३२.१, मालेगाव ४३.६, नाशिक ३९.०, सांगली ३९.०, सातारा ३६.७, सोलापूर ४१.१, मुंबई ३४.१, अलिबाग ३२.३, रत्नागिरी ३४.२, डहाणू ३५.३, आैरंगाबाद ४२.६, परभणी ४४.८, अकोला ४६.९, अमरावती ४६.४, बुलडाणा ४३.०, ब्रह्मपुरी ४५.०, चंद्रपूर ४५.४, गोंदिया ४३.२, नागपूर ४४.४, वर्धा ४६.५, यवतमाळ ४५.५.

 

इतर अॅग्रो विशेष
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...