agrowon news in marathi, rain possibilities in central Maharashtra, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 मे 2018

पुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत (ता. २९) वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका कमी झाला असतानाच विदर्भात उष्णतेची लाट आली अाहे. वर्धा येथे उच्चांकी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात उष्णतेची लाट सोमवारपर्यंत (ता. २८) कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत (ता. २९) वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका कमी झाला असतानाच विदर्भात उष्णतेची लाट आली अाहे. वर्धा येथे उच्चांकी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात उष्णतेची लाट सोमवारपर्यंत (ता. २८) कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका कमी झाला आहे. मालेगाव वगळता इतर ठिकाणी तापमान ३२ ते ३६ अंशांच्या आसपास आहे. मराठवाड्यात पारा ४१ ते ४५ अंश, तर विदर्भात बहुतांशी ठिकाणी ४४ ते ४६ अंशांदरम्यान तापमानाची नोंद होत आहे. विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि वर्धा येथे तापमान ४५ अंशांपेक्षा अधिक असल्याने उष्णतेची लाट अाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, अरबी समुद्रावरून होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होत असून, वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.  

शुक्रवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.७, नगर ३६.५, कोल्हापूर ३३.८, महाबळेश्वर २४.६, मालेगाव ४१.२, नाशिक ३६.३, सांगली ३५.७, सातारा ३२.६, सोलापूर ३९.३, मुंबई ३४.७, अलिबाग ३५.२, रत्नागिरी ३४.६, डहाणू ३५.९, आैरंगाबाद ४१.०, परभणी ४४.८, नांदेड ४३.०, अकोला ४४.७, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४५.२, चंद्रपूर ४५.७, गोंदिया ४१.८, नागपूर ४४.७, वर्धा ४६.०, यवतमाळ ४४.५.

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...