agrowon news in marathi, rain possibilities in Kakan and central maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. गुरुवारी रात्री कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे. उर्वरित भागात ऊन-सावल्याचा खेळ होता. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात उकाडा वाढून कमाल तापमानात वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. गुरुवारी रात्री कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे. उर्वरित भागात ऊन-सावल्याचा खेळ होता. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात उकाडा वाढून कमाल तापमानात वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

सध्या पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. कोकणाच्या काही भागात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने गुरुवारी रात्री भिरा, फोंडा, सांगे येथे तीन मिलिमीटर पाऊस पडला. देवगड, दोडामार्ग, केपे, म्हसळा, राजापूर, रोह, उल्हासनगर, वाल्पोई येथे प्रत्येकी एक मिलिमीटर पाऊस पडला. तसेच दावडी, डुंगरवाडी येथे दोन मिलिमीटर, अंबोणे, शिरगाव, कोयना, ताम्हिणी या घाटमाथ्यावर एक मिलिमीटर पाऊस पडला. 

राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भातील चंद्रपूर येथे चाळीस अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे वातावरणात काहीसा उकाडा वाढला होता. परिणामी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. कोकणातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व  विदर्भातील कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.  
पुढील आठवड्यात माॅन्सून काही प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता असली तरी अजून काही दिवस पावसाची शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. येत्या मंगळवारपर्यंत कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.  

शुक्रवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) ः मुंबई ३३.८, सांताक्रूझ ३४.०, अलिबाग ३४.७, रत्नागिरी ३१.५,डहाणू ३४.८, पुणे ३३.१, जळगाव ३९.८, कोल्हापूर ३०.९, महाबळेश्वर २१.६, मालेगाव ३८.४, नाशिक ३३.६, सांगली ३२.०, सातारा ३०.२, सोलापूर ३४.५, औरंगाबाद ३६.३, परभणी शहर ३७.०, नांदेड ३७.०, अकोला ३९.२, अमरावती ३८.४, बुलढाणा ३८.०, ब्रम्हपुरी ३९.४, चंद्रपूर ४०.०, गोंदिया ३८.५, नागपूर ३९.१, वाशीम ३७.६, वर्धा ३९.२, यवतमाळ ३७.५.

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...