कोकणात जोर कायम राहणार

कोकणात जोर कायम राहणार
कोकणात जोर कायम राहणार

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण किनारपट्टीवर धुवाधार पाऊस कोसळत आहे. आज (ता. १२) कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज आहे. बुधवारपर्यंत (ता. १३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.  शुक्रवारपासून (ता.८) कोकण किनारपट्टीवर दमदार पाऊस पडत आहे. रविवारी (ता.१०) पावसाचा जोर कायम असल्याने लांजा येथे उच्चांकी २२० मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. तर, दोडामार्ग, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी, वैभववाडीसह अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील कोकणाच्या चंदगड येथे १४० मिलिमीटर पाऊस पडला. साेमवारी मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी अधून-मधून सरी येत होत्या. तर, कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू असल्याने वाफसाअभावी पेरणी खोळंबली आहे.   मराठवाड्यातील मुखेड, नांदेड, उमरी येथे; तर विदर्भातील दारव्हा नागपूरमध्ये मुसळधार पावसाने दणका दिला. नांदेड मधील अर्धापूर येथे पावसाने जमिनीचा सुपीक थर वाहून गेला. मुसळधार पावसामुळे ओढे, नाल्यांना आलेल्या पुरांमुळे पुलांवरून पाणी वाहून गावांचा संपर्क तुटला होता. तसेच, जमीन खरडून त्यासोबत पेरणी केलेले बियाणे वाहून जात आहे. तर, पावसामुळे पेरणी सुरू करता येत नसल्याचे चित्र अनेक भागांत दिसत आहे.  सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत हवामान विभाग) :  कोकण : लांजा २२०, दोडामार्ग १७०, रत्नागिरी १६०, राजापूर १६०, कणकवली, वेंगुर्ला प्रत्येकी १३०, सावंतवाडी, वैभववाडी प्रत्येकी १२०, कुडाळ, रामेश्‍वर प्रत्येकी १००, चिपळूण, देवगड प्रत्येकी ९०, मालवण ८०, खेड, महाड प्रत्येकी ७०, संगमेश्‍वर, देवरुख प्रत्येकी ६०, गुहागर, सांगे प्रत्येकी ५०. भिरा, मंडणगड, माथेरान, पोलादपूर, रोहा प्रत्येकी ४०. मध्य महाराष्ट्र : चंदगड १४०, राधानगरी ९०, महाबळेश्‍वर ८०, गगनबावडा, गारगोटी प्रत्येकी ६०, आजरा, शाहूवाडी प्रत्येकी ५०, गडहिंग्लज, पौड, मुळशी प्रत्येकी ३०.  मराठवाडा : मुखेड, नांदेड, उमरी प्रत्येकी ८०, धर्माबाद, मानवत, नायगाव खैरगाव प्रत्येकी ७०, अर्धापूर, परतूर प्रत्येकी ६०, देवणी, लोहा, परभणी प्रत्येकी ५०, बिलोली, चाकूर, हिमायतनगर, कंधार, पाथरी, पूर्णा, सेलू, वसमत प्रत्येकी ४०, भूम, माहूर, माजलगाव, मुदखेड, परळी वैजनाथ, सोनपेठ प्रत्येकी ३०.  विदर्भ : दारव्हा, नागपूर प्रत्येकी ७०, मंगरुळपीर ६०, बाभूळगाव, चांदूर, महागाव, मूलचेरा, उमरेड प्रत्येकी ५०, अंजनगाव, चिखलदरा, करंजालाड मूर्तीजापूर, पुसद प्रत्येकी ४०, बार्शी टाकळी, बटकुली, भामरागड, चांदूरबाजार, दिनपूर, दिग्रस, हिंगणघाट, काटोल, लोणार, मानोरा, मोर्शी, परतवाडा, वणी, वर्धा, यवतमाळ प्रत्येकी ३०.  घाटमाथा : शिरगाव ८०, दावडी, ताम्हणी प्रत्यकी ७०, आंबोणे, कायना नवजा प्रत्यकी ६०, शिरोटा, डुंगरवाडी प्रत्येकी ५०, भिरा, वळवण, कोयना प्रत्येकी ४०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com