agrowon news in marathi, rain possibilities in Kokan and central Maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार; माॅन्सूनच्या प्रगतीची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

पुणे  : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने कोकण किनारपट्टीवर पावसाने जोर धरला अाहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. आज (ता. १९) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिली आहे; तर बुधवारी (ता.२०) गुरुवारी (ता.२१) कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी; तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे.

पुणे  : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने कोकण किनारपट्टीवर पावसाने जोर धरला अाहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. आज (ता. १९) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिली आहे; तर बुधवारी (ता.२०) गुरुवारी (ता.२१) कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी; तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे.

दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. रायगडमधील मुरूड येथे २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उरण, म्हसळा, पेण, रोहा, श्रीवर्धन, अलिबाग, गुहागर, रत्नागिरी, हर्णे येथे पावसाने दमदार हजेरी लावली. सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातही पावसाच्या सरीवर सरी सुरू आहेत.

मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असला तरी, बहुतांश ठिकाणी मुख्यत: कोरडे हवामान होते.मध्य महाराष्ट्रातील तापमानात काहीशी घट झाली; तर विदर्भात तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्राेत- हवामान विभाग) : कोकण : मुरूड २१०, उरण १४०, म्हसळा, पेण, रोहा, श्रीवर्धन प्रत्येकी १३०, अलिबाग, गुहागर, रत्नागिरी प्रत्येकी ११०, हर्णे १००, ठाणे ९०, बेलापूर, चिपळूण, कर्जत, मालवण, वैभववाडी प्रत्येकी ८०, देवगड, खेड, मंडणगड, माणगाव, राजापूर प्रत्येकी ७०. मध्य महाराष्ट्र : महाबळेश्‍वर ५०, गगणबावडा ४०, लोणावळा, ओझरखेडा प्रत्येकी ३०. घाटमाथा : अंबोणे ७०, भिरा, भिवापुरी, डुंगरवाडी, कोयना नवजा, ताम्हिणी, खोपोली प्रत्येकी ४०. शिरगाव, दावडी, कोयना पोफळी प्रत्येकी ३०.मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव : विहार १३०, तुलसी ८०, तानसा ४०.

माॅन्सूनच्या प्रगतीची प्रतीक्षा
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची (माॅन्सून) महाराष्ट्रातील वाटचाल ११ जूनपासून जैसे थे आहे. ११ जून रोजी विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात दाखल झालेल्या मॉन्सूनची कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ९ जूनपासून कोणतीही प्रगती झालेली नाही. माॅन्सूनचे प्रवाह मंदावल्याने आणखी पाच ते सहा दिवस मॉन्सूनची वाटचाल होणार नसल्याने पुढील प्रवासासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...