agrowon news in marathi, Rain possibilities in Kokan central Maharashtra and Vidarbha, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधारेचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

पुणे : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार सुरूच आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भ, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली. मात्र, राज्याच्या बहुतांशी भागांत अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यात आज (ता.२८) सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
 

पुणे : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार सुरूच आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भ, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली. मात्र, राज्याच्या बहुतांशी भागांत अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यात आज (ता.२८) सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
 

गेले काही दिवस कोकण किनारपट्टीवर धुवाधार बरसणाऱ्या पावसाने मंगळवारी उसंत घेतली होती. मात्र, घाटमाथ्यावर पावसाची दमदार बरसात सुरूच होती. शिरगाव येथे उच्चांकी १७० मिलिमीटर पाऊस पडला, तर कोयना नवजा येथे १५०, तर दवडी येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील कोल्हापूर, पुणे, सातारा, नगर, नाशिक जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस पडला. कोल्हापूरच्या चंदगड येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. साताऱ्यातील महाबळेश्‍वरसह कोयना धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस आहे. 

पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी तालुक्यासह धरणांच्या पाणलोटात दमदार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्‍यात पाऊस सुरूच असल्याने मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण भरून वाहू लागले आहे. जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील हतनूर धरणाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू असून, जिल्ह्याच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील अकोला, वाशीम या जिल्ह्यांमध्ये बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंत सर्वदूर पाऊस पडला. तर, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोलीत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. 

बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - हवामान विभाग) : 

कोकण : राजापूर ९०, गुहागर ८०, भिरा, चिपळूण, तलासरी प्रत्येकी ७०, दोडार्माग, खालापूर प्रत्येकी ६०, दापोली, देवगड, कणकवली, माथेरान, संगमेश्‍वर, देवरुख, शहापूर, वैभववाडी प्रत्येकी ५०, खेड, पनवेल, पेण प्रत्येकी ४०, कल्याण, कर्जत, महाड, मंडणगड, रत्नागिरी, सुधागड पाली प्रत्येकी ३०, जव्हार, मोखेडा, मुंबई, मुरबाड, पोलादपूर, रोहा, सावंतवाडी, ठाणे, वाडा प्रत्येकी २०.
 
मध्य महाराष्ट्र : चंदगड १००, राधानगरी ८०, इगतपुरी ६०, भूदरगड ५०, आजरा, गगनबावडा, पारोळा प्रत्येकी ४०, महाबळेश्‍वर, पाटण, शाहूवाडी प्रत्येकी ३०, दहीगाव, गडहिंग्लज, हातकणंगले, जामनेर, जावळीमेढा, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर प्रत्येकी १०.

मराठवाडा : हदगाव ४०, औंढा नागनाथ, मुदखेड, उमरी, वसमत प्रत्येकी ३०, हिंगोली, कळमनुरी, नांदेड, परभणी, पूर्णा प्रत्येकी २०. 
 
विदर्भ : भामरागड, मूर्तिजापूर प्रत्येकी ५०, अकोला ४०, बाभूळगाव, दिग्रस, एटापल्ली, मंगरुळपीर, मनोरा, नांदगाव काझी, वाशिम प्रत्येकी ३०, अहिरी, बाळापूर, चांदूर, चिखलदरा, चिमूर, धरणी, गोंडपिंपरी, करंजालाड, खामगाव, मालेगाव, मलकापूर, मुलचेरा, नांदुरा, पारशिवणी, पुसद, राळेगाव प्रत्येकी २०.

घाटमाथा : शिरगाव १७०, कोयना नवजा १५०, दावडी ११०, ताम्हिणी, डुंगरवाडी प्रत्येकी ९०, कोयना पोफळी ७०, आंबोणे, लोणावळा प्रत्येकी ५०, खोपोली, भिवापुरी, वळवण, शिरोटा.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...