agrowon news in marathi, rain possibilities in Kokan, south central Maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज मुसळधारेचा अंदाज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज (ता. २०) कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर उद्या (ता. २१) कोकणात अतिवृष्टीचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज (ता. २०) कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर उद्या (ता. २१) कोकणात अतिवृष्टीचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी कोकणात पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, सोमवारी दिवसभर पावसाचा जोर काहीसा कमी असल्याचे दिसून आले. कोकणातील म्हसळा येथे उच्चांकी १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी कोकण किनाऱ्यावर ढग जमा झाले होते. तर नगर जिल्ह्यात कर्जत आणि परनेर तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली, तर विदर्भात तापमान चाळीस अंशांच्या अासपास होते.  

मंगळवारी (ता. १९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.७, नगर ३४.०, जळगाव ३८.२, कोल्हापूर २८.०, महाबळेश्वर १९.७, मालेगाव ३९.०, नाशिक ३२.२, सांगली २८.०, सातारा २८.६, सोलापूर ३२.९, मुंबई ३१.०, अलिबाग २९.१, रत्नागिरी २६.०, डहाणू ३४.०, आैरंगाबाद ३६.४, परभणी ३५.४, नांदेड ३६.०, अकोला ३९.२, अमरावती ३८.०, बुलडाणा ३७.०, ब्रह्मपुरी ३८.९, चंद्रपूर ३९.४, गोंदिया ३७.४, नागपूर ३६.०, वर्धा ३९.०, यवतमाळ ३६.५. 

मंगळवार (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये, स्त्रोत - हवामान विभाग) : 
कोकण : म्हसळा १००, गुहागर, श्रीवर्धन प्रत्येकी ७०, वेंगुर्ला, राजापूर प्रत्येकी ६०, देवगड, हर्णे, माणगाव प्रत्येकी ५०, चिपळूण, दोडमार्ग प्रत्येकी ४०, कणकवली, कुडाळ, मालवण, वैभववाडी प्रत्येकी ३०, दापोली, खेड, मंडणगड, मुरूड, रत्नागिरी, संगमेश्‍वर, देवरुख, सावंतवाडी प्रत्येकी २०.     
मध्य महाराष्ट्र : रावेर ४०, बोधवड ३०, गगनबावडा, संगमनेर प्रत्येकी २०, चंदगड, भूदरगड, कळवण, महाबळेश्‍वर, शाहूवाडी प्रत्येकी १०.
मराठवाडा : बदलापूर, सोनपेठ प्रत्येकी २०, जालना, फुलांब्री प्रत्येकी १०.
विदर्भ : पातूर ५०, सावनेर ४०, मलकापूर, नागपूर प्रत्येकी ३०, बार्शीटाकळी, चांदूर बाजार, देवळी, नांदगाव प्रत्येकी २०, भद्रावती, चंद्रपूर, चांदूर, धामणगाव, गडचिरोली, हिंगणा, करजालाड, कुही, मंगरुळपीर, मोर्शी, मातोळा, पौनी प्रत्येकी १०.
घाटमाथा : कोयना नवजा ४०, खंद, शिरगाव प्रत्येकी ३०,ताम्हिणी, डुंगरवाडी, दावडी, भिरा प्रत्येकी २०.
 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...