जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
अॅग्रो विशेष
पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्याच्या विविध भागांत पावसाने हजरी लावली आहे. गुरुवारपर्यंत (ता. २८) राज्यात सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील गुहागर येथे उच्चांकी २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्याच्या विविध भागांत पावसाने हजरी लावली आहे. गुरुवारपर्यंत (ता. २८) राज्यात सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील गुहागर येथे उच्चांकी २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मॉन्सूनने जवळपास सर्व महाराष्ट्र व्यापला असून, राज्यात ढगाळ हवामान आहे. कोकणात पावसाने जोर धरला असून, बहुतांशी ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आले असून, शेतात पाणी साचले आहे.
वापसा येताच या भागात खरिपाच्या पेरण्या सुरू होणार अाहेत. तर, काही भागांत खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी अद्यापही पावसाने समाधानकारक पाऊस झाला नसून, जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - हवामान विभाग) :
कोकण : गुहागर २५०, श्रीवर्धन २४०, हर्णे १९०, म्हसळा, रत्नागिरी प्रत्येकी १७०, मुंबई १५०, देवगड १२०, कणकवली, मंडणगड, पालघर प्रत्येकी ११०, खेड, मालवण प्रत्येकी १००, पेण ९०, अलिबाग ८०, कुडाळ, लांजा, संगमेश्वर, वेंगुर्ला ७०, चिपळूण, डहाणू, राजापूर प्रत्येकी ६०, कर्जत, पोलादपूर, सांगे, वसई प्रत्येकी ५०, महाड, वैभववाडी प्रत्येकी ४०, कल्याण, माथेरान, पनवेल, रोहा, सावंतवाडी, ठाणे, वाल्पोई प्रत्येकी ३०.
मध्य महाराष्ट्र : श्रीरामपूर ८०, साक्री ६०, नगर, जामखेड, महाबळेश्वर, नेवासा, पारोळा प्रत्येकी ५०, बार्शी, देवळा, संगमनेर, सटाणा, बागलाण प्रत्येकी ४०, बोधवड, चाळीसगाव, चांदवड, धडगाव, धुळे, गगणबावडा, गारगोटी, भूदरगड, पाथर्डी, राधानगरी, शिरपूर, येवला प्रत्येकी ३०, लोणावळा, राहता, राहुरी प्रत्येकी २.
मराठवाडा : फलांब्री ८०, आंबेजोगाई, पाटोदा प्रत्येकी ७०, औंढा नागनाथ, वडवणी प्रत्येकी ५०, बीड, केज प्रत्येकी ४०, बदलापूर, भूम, कळंब, कन्नड, लातूर, रेणापूर प्रत्येकी ३०, आष्टी, धारूर, गंगाखेड, हिमायतनगर, हिंगोली, जळकोट, कंधार, मुदखेड, शिरूर, सोयगाव, उमरगा प्रत्येकी २०.
विदर्भ : पातूर, उमरखेड प्रत्येकी ५०, बाळापूर ४०, जळगाव जामोद, मेहकर, खामगाव, मातोळा प्रत्येकी ३०, संग्रामपूर, झारी झामनी, चिखली, शेगाव, नेर, वाशिम प्रत्येकी २०.
- 1 of 288
- ››