agrowon news in marathi, Rain possibilities in state from today, Maharashtra | Agrowon

राज्यात आजपासून पावसाची शक्यता
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे ः अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. सोमवारपासून (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज आहे. बुधवारपासून (ता. ३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे.  

पुणे ः अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. सोमवारपासून (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज आहे. बुधवारपासून (ता. ३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे.  

केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यांलगत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने या भागात ढगांनी दाटी केली आहे. पश्‍चिम किनाऱ्यालगत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता अाहे. अरबी समुद्रात उंच लाट उसळून समुद्र खवळणार असल्याने केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत मासेमारीसाठी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढग गोळा होत असल्याने पावसाला पोषक वातावरण होत आहे. 

ढगाळ हवामानामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहेत. विदर्भाच्या तापमानात काहीशी घट झाली अाहे. विदर्भातील वर्धा, अकोला आणि मराठवाड्यातील परभणी येथे ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान असल्याने उष्णतेची लाट होती. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे राज्यातील उच्चांकी ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात मंगळवारपर्यत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

रविवारी (ता. २७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.२, नगर ४२.६, जळगाव ४४.०, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.४, नाशिक ४०.१, सांगली ३६.४, सातारा ४०.१, सोलापूर ४३.०, मुंबई ३४.१, अलिबाग ३३.२, रत्नागिरी ३४.३, डहाणू ३४.८, आैरंगाबाद ४२.०, परभणी ४५.३, नांदेड ४२.५, अकोला ४५.३, बुलडाणा ४४.४, ब्रह्मपुरी ४४.९, चंद्रपूर ४३.९, गोंदिया ४३.९, नागपूर ४३.७, वर्धा ४५.०, यवतमाळ ४४.०.

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...