agrowon news in marathi, Rain in Pune, Nashik, Maharashtra | Agrowon

पुणे, नाशिकसह घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या सरी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

पुणे ः माॅन्सूनची तीव्रता कमी झाल्याने राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. गुरुवारी (ता. २८) मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. बुधवारी (ता. २७) सायंकाळी कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला आहे. 

पुणे ः माॅन्सूनची तीव्रता कमी झाल्याने राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. गुरुवारी (ता. २८) मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. बुधवारी (ता. २७) सायंकाळी कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला आहे. 

राज्यात २० ते २१ जूननंतर माॅन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मागील सात ते आठ दिवसांपासून राज्यातील बहुतांशी ठिकाणी पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, खान्देशातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

मराठवाड्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या असून बहुतांशी ठिकाणी वातावरण ढगाळ आहे. आज कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसासाठी पोषक हवामान नसल्याने पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

पुढील आठवड्यात पोषक हवामान झाल्यास पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.  
 बुधवारी सायंकाळी कोकणातील मंडणगड, संगमेश्वर देवरूख, भिरा, वैभववाडी, कणकवली, लांजा अशा अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील राधानगरी, गगनबावडा, इगतपुरी, चांदगड, लोणावळा, महाबळेश्वर, वेल्हे येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

मराठवाड्यातील माहूर, गंगाखेड, किनवट, उमरी येथे हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ तर काही ठिकाणी ऊन सावल्याचा खेळ सुरू होता. विदर्भातील मौदा, पेरसेवनी, देसाईगंज, कोरची, सडकअर्जुनी, गोंदिया, हिंगणघाट, जोती, कुरखेडा अशा विविध ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. उर्वरित भागात हलका पाऊस पडला असून काही भागात ढगाळ हवामान होते.  

गुरुवारी (ता. २८) सकाळपर्यंत झालेला पाऊस ः मिलिमीटरमध्ये 
कोकण ः मंडणगड, संगमेश्वर देवरूख ९०, भिरा, वैभववाडी ७०, कणकवली, लांजा, म्हसाळा, राजापूर ५०, सांगे ४०, दोडामार्ग, खेड, माथेरान, 
पेण, फोंडा, रत्नागिरी, रोहा, सावंतवाडी, ठाणे ३०, 
मध्य महाराष्ट्र ः राधानगरी ७०, गगनबावडा, इगतपुरी ६०, चांदगड ५०, लोणावळा, महाबळेश्वर ३०, पारोळा, वेल्हे २०, आजरा, भडगाव, भोर, भुसावळ, दहिगाव,
एरंडोल, जावळेमेधा, ओझरखेड, पाटण १०
मराठवाडा ः माहूर ६०, गंगाखेड ४०, किनवट ३०, उमरी २०, बिलोली, नायगाव, खैरगाव १० 
विदर्भ  ः मौदा, पेरसेवनी ८०, देसाईगंज, कोरची, सडकअर्जुनी ७०, गोंदिया, हिंगणघाट, जोती, कुरखेडा ६०, आरमोरी, भद्रावती, भामरागड, देवरी, कामठी,
कुही, लाखांदूर, नारखेड, साकोली ५०, अर्जुनीमोरगाव, धानोरा, गोंदिया, नागपूर, सावनेर, तिरोरा, ४०, अहिरी, आमगाव, आरणी, भंडारा, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, चांदूर,
चिमूर, दिग्रस, इटापल्ली, घाटंजी, मूलचेरा, नांदगाव काजी, रामटेक, सिरोंचा, तुमसर, वर्धा, वरोरा, वरूड, यवतमाळ ३०

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...