राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

 सिल्लोड तालुक्यात अंभईसह परिसरात शुक्रवारी  (ता.२२) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने नदीला पूर आला होता.
सिल्लोड तालुक्यात अंभईसह परिसरात शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने नदीला पूर आला होता.

पुणे ः राज्यातील अनेक भागांत शुक्रवारी (ता. २२) पावसाने हजेरी लावली. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्यात शुक्रवारी वीज पडून आठ जण मृत्यूमुखी पडले आहेत. यात नगर जिल्ह्यात एक, मराठवाड्यात चार आणि विदर्भात तीन जणांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसांत माॅन्सून अधिक सक्रिय होणार असून, अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. शुक्रवारी दिवसभर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामान होते, तर घाटमाथ्यावर पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. मध्य महाराष्ट्रात दुपारपर्यंत ढगाळ हवामान होते. दुपारनंतर ऊन- सावल्यांचा खेळ सुरू होता. मराठवाडा व विदर्भातही काही अंशी ढगाळ हवामान होते, तर अधूनमधून ऊन पडत असल्याचे चित्र होते. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागांत पावसाची सकाळी संततधार सुरू होती.

राज्यात गुरुवारी (ता. २१) सायंकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकटासह पाऊस झाला. या वेळी राज्यात वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात दोन, देगलूर तालुक्यात एक, लातूर जिल्ह्यात एक, बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यात दोन व्यक्तीच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तसेच, यवतमाळ जिल्ह्यात करंजी रोड येथून जवळच असलेल्या दहेगाव शिवारातील नालाई पोड येथे सरकी टोबण्याचे काम करणाऱ्या शेतमजुरांवर वीज पडली. त्यात एक महिला ठार, तर पाच मजूर जखमी झाले. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव येथे एका बैलाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे.       शुक्रवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस ः (मिलिमीटरमध्ये)  कोकण, गोवा ः हरणे १८०, दापोली, गुहागर, श्रीवर्धन १५०, पेण १४०, रोहा, सावंतवाडी १३०, म्हसळा ९०, खेड ८०, पेडणे ७०, मानगाव ६०, चिपळूण, खालापूर, माथेरान, पोलादपूर ५०, महाड, मंडणगड, संगमेश्वर देवरूख, उरण ४०, पनवेल, राजापूर, रत्नागिरी, सुधागडपाली ३०, लांजा, वैभववाडी २०, कोनकोन, देवगड, कणकवली, कुडाळ १० मध्य महाराष्ट्र ः कोपरगाव ८०, पुणे, श्रीगोंदा ७०, अक्कलकोट, राहाता, शिरूर, घोडनदी ६०, पारनेर ५०, राहुरी, येवला ४०, चांदवड, गगनबावडा, गिरना, जामखेड, नेवासा, बारामती, संगमनेर, सांगोला, शहादा, श्रीरामपूर, वेल्हे ३०, बोदवड, चाळीसगाव, दहीवडी, दौड, महाबळेश्वर, नांदगाव, मोहोळ, पाथर्डी, सातारा, अकोले, बारामती, भोर, जामनेर, कर्जत, खंडाळा बावडा १०  मराठवाडा ः औरंगाबाद ६०, आष्टी, औसा, भोकरदन, गंगापूर ४०, बदलापूर, कन्नड, किनवट, वैजापूर ३०, हिमायतनगर, मुदखेड, मुखेड, फुलंब्री, उमरगा, सिल्लोड २०  विदर्भ ः बुलडाणा, मौदा, राजुरा ७०, गडचिरोली ६०, देसाईगंज, धारणी, खांरगी ५०, अकोट, आष्टी, चिखलदरा, काटोल, परतवाडा, वणी ४०, अंजनगाव, अर्जुनी मोरगाव, आरमोरी, चार्मोशी, धानोरा, कळमेश्वर, कोर्ची, मारेगाव, रामटेक, सिंरोचा, वरूड ३०, चांदूर बाजार, दारव्हा, मालेगाव, मूळ, मूर्तिजापूर, नागभीड,  पौनी, सेलू २०, अहिरी, बटकोली, भामरागड, ब्रह्मपुरी, देवळी, घाटंजी, जळगाव जामोद, कामठी १०     शुक्रवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)   मुंबई ३२.८, सांताक्रूझ ३२.७, अलिबाग ३१.८, रत्नागिरी २५.३, डहाणू ३४.४, पुणे ३३.६, जळगाव ३७.२, कोल्हापूर २६.४, महाबळेश्वर २२.०, मालेगाव ३३.०, नाशिक ३२.८, सांगली २८.१, सातारा २९.६, सोलापूर ३६.३, औरंगाबाद ३३.८, परभणी शहर ३६.८, नांदेड ३७.०, अकोला ३७.०, अमरावती ३५.४, बुलडाणा ३६.०, ब्रह्मपुरी ३८.६, चंद्रपूर ३९.६, गोंदिया ४०.२, नागपूर ३८.०, वाशीम ३५.०, वर्धा ३९.५, यवतमाळ ३६.५. 

दोन दिवसांत जोर वाढणार महाराष्ट्र ते केरळ या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून, कोकणच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे येत्या मंगळवार (ता. २६) पर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज (ता. २३) मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, कोकण गोवा व विदर्भात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही आकाश सामान्यतः ढगाळ राहील. तसेच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com