राज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप मोठी होईल.
अॅग्रो विशेष
पुणे ः मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत शनिवारी (ता. २६) रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह पूर्वमोसमी पावसाने दणका दिला. तर रविवारी दुपारी सिंधुदर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत पाऊस झाला. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यामुळे केळी बागा मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

विदर्भातील नागपूर, वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही भागांत दहा ते पंधरा मिनिटे पाऊस बरसला, तर काही भागांत अर्धा तास कोसळत होता. यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने घरावरील टिनपत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले.
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे जलयुक्त शिवारच्या अभियानातून करण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी जमा झाले. या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग येणार आहे. विदर्भातही वादळी वाऱ्याने झाडपडीच्या आणि घराचे पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये शनिवारी (ता. २६) वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळामुळे नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील केळी बागा मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव, रिधोरा, हयातनगर, तेलगाव, आरळ आदी गावशिवारात जोरदार पाऊस झाला. गिरगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा मोडून पडल्याने नुकसान झाले.
परभणी जिल्ह्यातील परभणी, पूर्णा तसेच अन्य तालुक्यांत पाऊस झाला. पांगरा ढोणे येथील कुंडलिग ढोणे या शेतकऱ्याचा बैल जखमी झाला. येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या नालाखोलीकरणामुळे बंधाऱ्यामध्ये पाणी जमा झाला आहे. पूर्वमोसमी पावसामुळे नांगरट केलेल्या शेतातील मातीचे ढेकूळ विरघळून गेल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
- 1 of 289
- ››