agrowon news in marathi, Raju shetty says morcha for farmers issue, Maharashtra | Agrowon

दूध दर, एफआरपीप्रश्नी मोर्चा काढणार ः राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

कोल्हापूर : उसाची थकीत एफआरपी व गाय दूध दरप्रश्‍नी सरकारने तोडगा काढून दूध उत्पादक आणि दूध संस्थांना चालना द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी 29 जूनला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यात साखर व दूध आयुक्तालयावर मोर्चा काढला जाणार आहे. अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 

कोल्हापूर : उसाची थकीत एफआरपी व गाय दूध दरप्रश्‍नी सरकारने तोडगा काढून दूध उत्पादक आणि दूध संस्थांना चालना द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी 29 जूनला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यात साखर व दूध आयुक्तालयावर मोर्चा काढला जाणार आहे. अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 

श्री. शेट्टी म्हणाले, की गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये थेट उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्यास काही प्रमाणात उत्पादक आणि संस्थांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. साखरेचे भाव पडले म्हणून ऊस उत्पादकांची बिले थकविणे योग्य नाही. उसाचा वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी आपला लढा सुरू आहे. यासाठी देशातील शेतकरी संघटनांना एकत्र आणून सरकारवर दबाव आणला जातोय. लवकरच याप्रश्‍नी ठोस दिशा निश्‍चित केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

गायीच्या दुधाचे वाढते प्रमाण
तसेच दूध पावडर तयार करण्यासाठी खरेदीच्या दरापेक्षा जादा पैसे मोजावे लागत आहेत. यातून लिटरमागे दूध संस्थांना नऊ ते दहा रुपयांचे नुकसान सोसावे लागते. आज अनेक संस्थांना गायीचे दूध खरेदी करण्यावर मर्यादा येत आहेत. थेट उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये दिल्यास काहीसा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे थकीत ऊस दर आणि गायीच्या दूध दरप्रश्‍नी साखर आणि दूध आयुक्तालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...