agrowon news in marathi, rate of cow shrunk after milk rate cut, Maharashtra | Agrowon

दुधानंतर आता गायींचे दर घसरले
अभिजित डाके
मंगळवार, 19 जून 2018

बाजार समितीच्या आवारात गायींची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. मात्र, गाईच्या दुधाचे दर कमी झाल्याने याचा गायींच्या किमतींवरही झाला आहे. यामुळे बाजार समितीची उलाढालीवर परिणाम झाला आहे.
- डी. बी. जाधव, सहा. सचिव, शामराव बंडुजी पाटील दुय्यम बाजार आवार, मिरज.

सांगली : गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहे. जनावरं दावणीला सांभाळणं दिवसेंदिवस अवघड होत आहे. परिणामी मिरज येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी संकरित गायींची संख्या वाढली आहे. याचा परिणाम गायींच्या दरावर झाला आहे. एरवी गाई ७० हजार ते ८० हजार रुपयांना खरेदी केली जाते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे २५ ते ३० हजार पर्यंत दर आले असून ४० ते ५० हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तसचे गाई खरेदीकडेरी पशुपालकांनी पाठ फिरवली आहे.

मिरज येथील जनावरांचा बाजार हा राज्यात गायींसाठी प्रसिद्ध आहे. या बाजाराची उलाढाल कोट्यवधींची आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गाईच्या दुधाच्या दराचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे गाई दावणीला सांभाळण कठीण होत चालले आहे. गाई विक्रीशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मिरज येथे दर बुधवारी जनावरांचा बाजार भरतो. गेल्या दोन महिन्यांपासून संकरित गायींच्या आवक वाढली आहे. मात्र, गाईला दर मिळत नसल्याने गायींची खरेदी ठप्प झाली आहे. गेल्या दहा वर्षांत प्रथमच इतकी गंभीर स्थिती ओढवल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

गाईचे दूध स्वीकारण्यास दूध संघांनी नकार दिल्याने त्यांना बाजाराची वाट दाखवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. संकरित गायींची आवक मोठ्या प्रमाणात झाली; पण ग्राहक फिरकले नाहीत. त्यांच्या वाहतुकीचाही खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडला. किंमती वीस ते तीस टक्‍क्‍यांनी घसरल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

कडेगाव, शिरोळ, इस्लामपूर, कराड, जत, तासगाव, अथणी, कागवाड इत्यादी भागातून शेतकरी संकरीत गाई विक्रीसाठी घेऊन आले होते. दीड महिन्यापासून गायींची आवक वाढली असून मागणी कमी झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत गाईच्या दुधाला तसेच गायींना मागणी असते; यंदा मात्र परिस्थिती वेगळी निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.

मिरज येथील यशामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजारातील गायींचे झालेले व्यवहार           

महिना  आवक    विक्री  सरासरी दर   उलाढाल
२०१७        
एप्रिल  ४३०  २००  ७० हजार  १ कोटी २४ लाख
मे     ८२५    ३००  ७० हजार  १ कोटी ७४ लाख
२०१८        
एप्रिल    ५५० १५९      ४० हजार  ६८ लाख ३७ हजार
मे  ६२०       १६८    ४५ हजार    ६७ लाख २० हजार

 

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...