agrowon news in marathi, ravikant tupkar says, farmers should come together, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांनो पक्षभेद विसरून एकत्र या : तुपकर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

बुलडाणा ः भाजपचे अध्यक्ष अमित शहा व इतर नेते सिनेअभिनेत्यांच्या घरी जातात. मात्र शेतकरी अडचणीत असताना एकही जण त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांंच्या जमिनी काढून त्या उद्योगपतिंना देण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव अाहे. अाज पीककर्ज वाटप करताना बँका शेतकऱ्यांना जागोजागी अाडकाठी अाणत अाहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पक्षभेद विसरून अापल्या हक्कासाठी एकत्र यायला हवे, असे अावाहन स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. 

बुलडाणा ः भाजपचे अध्यक्ष अमित शहा व इतर नेते सिनेअभिनेत्यांच्या घरी जातात. मात्र शेतकरी अडचणीत असताना एकही जण त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांंच्या जमिनी काढून त्या उद्योगपतिंना देण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव अाहे. अाज पीककर्ज वाटप करताना बँका शेतकऱ्यांना जागोजागी अाडकाठी अाणत अाहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पक्षभेद विसरून अापल्या हक्कासाठी एकत्र यायला हवे, असे अावाहन स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. 

सरसकट कर्जमाफी अाणि पीकविमा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (ता.१८) जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयावर जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा ‘दणका मोर्चा’ काढण्यात अाला. सुरवातीला वरवट-बकाल ते जळगाव जामोद अशी मोटर सायकल रॅली काढण्यात अाली. या मार्गात जागोजागी शेतकऱ्यांनी स्वागत केले. मोर्चा उपविभागीय कार्यालयासमोर पोचल्‍यानंतर तेथे सभा झाली. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, संघटक बबनराव चेके, राणा चंदन यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी तुपकर पुढे म्हणाले, अाज शेतकऱ्यांना पीककर्ज मिळवण्यासाठी दारोदारी भटकावे लागत अाहे. भाजपच्या लोकांनाही पीककर्ज मिळत नसल्याची वस्तुस्थिती असून असून अाज तेच अांदोलने करायला लागले. राज्यात व देशात यांचेच सरकार असताना जर बँका एेकत नसतील तर सर्व सामान्य माणसाने न्याय अाता अमेरिकेच्या ‘ट्रम्प’ कडे मागावा काय, असा प्रश्न केला. अाज शेतकरी गांधीजींच्या शांततावादी मार्गाने या ठिकाणी अाले. या अाठवडाभरात पीककर्ज वाटप न झाल्यास भगतसिंहाच्या मार्गाने (हिंसा) पोचतील, असा इशाराही तुपकर यांनी दिला.

तर बँक अधिकाऱ्यांना ठोकून काढा
पीक कर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा ज्या बँकांचे मॅनेजर अपमान करतील त्यांना जागेवर ठोकून काढा, अशी सूचना तुपकर यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना केली.

हजारो शेतकऱ्यांचे अर्ज
गेल्या हंगामात सर्व्हर लिंक बंद राहल्याने पीकविमा न भरू शकलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज या वेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाकडे पाठवला. या भागातील हजारो शेतकऱ्यांचे अर्जसुद्धा भरून देण्यात अाले अाहेत.

मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

  • पीककर्ज सरसकट माफ करा
  • कोणत्याही दाखल्यांचे निकष न लावता नवीन पीककर्ज द्या
  •  विमा न भरलेल्या वंचीत शेतकऱ्यांनाही पीकविम्याची अर्धी रक्कम द्या,
  • पतसंस्था, सावकार व फायनान्सकडून शेतकऱ्यांचा कर्जमाफीत समावेश करा
  • १४० गाव पाणीपुरवठा योजनेचे काम पारदर्शक करून गावांना पाणीपुरवठा करा
  • बोंड अळीची मदत खात्यात जमा करा
  • अाॅगस्ट २०१७ पासूनचे व्याज कोणत्याही बँकेने वसूल करू नये

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...