कर्नाटकात जून महिन्यात विक्रमी पाऊस

होजाई, आसाम येथे पूरग्रस्त भागातील नागरिकांना बोटीच्या साह्याने अन्न पुरविले जात आहे.
होजाई, आसाम येथे पूरग्रस्त भागातील नागरिकांना बोटीच्या साह्याने अन्न पुरविले जात आहे.

नवी दिल्ली : यंदा देशात वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे कर्नाटकात जून महिन्यातील विक्रमी पाऊस पडला आहे. तर तमिळानाडू आणि लक्षद्वीपमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे ईशान्य भारतातील आसाम, मणिपूर, त्रिपुरा राज्यांत निर्माण झालेली पूरस्थिती अजूनही काही प्रमाणात कायम आहे.   यंदा मॉन्सून दाखल झाल्यानंतर कर्नाटकात विक्रमी पाऊस झाला आहे. १ ते १० जून या काळात कर्नाटकात सरासरी ५२ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा याच काळात विक्रमी ९२ मिलिमीटर पाऊस झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तसेच कर्नाटकच्या किनारी भागात, केरळ, तमिळनाडूचा किनारी भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच सध्या मणिपूर, त्रिपुरा, आसाममध्ये पूरस्थिती कायम आहे. त्रिपुरातील धरमनगर भागात दरडी कोसळल्याने या राज्याचा देशाच्या अन्य भागाशी असलेला संपर्क तात्पुरता तुटला आहे.  आसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की ४,२५,३७३ लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. कचर जिल्ह्यातील दोन तसेच हैलाकंडी, होजाई जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्ती पुरबळी ठरली आहे. अर्धा हैलाकंडी जिल्हा पूरग्रस्त आहे. जिल्ह्यातील ३३१ पैैकी २३१ गावांना पुराने वेढले आहे. कटखल, धोलेश्वरी, बाराक या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. हैलाकंडी जिल्ह्यातील रहिवाशांसाठी ८७ मदतशिबिरे सुरू करण्यात आली असून, त्यात सध्या ५४,३६४ पूरग्रस्त राहत आहेत. आपत्कालीन मदत दलाने पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या ३१६ जणांचे प्राण वाचविले आहेत. आसामच्या अन्य सहा जिल्ह्यांत १०४ मदतशिबिरे सुरू करण्यात आली असून, त्यात ४५,६४६ पूरग्रस्त सध्या राहत आहेत. दिमा हसाव या जिल्ह्यात पावसामुळे माहूर, हरंगजाव, मैैलबंग या ठिकाणी दरडी कोसळल्या; तसेच ११४ घरांची पडझड असून, लुमडिंग ते बदरपूर दरम्यानची रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com