agrowon news in marathi, revolution from agri dams , Maharashtra | Agrowon

खारपाणपट्ट्यात मोठ्या शेततळ्यांमुळे जलक्रांती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

अकोला ः  रस्ता, लाेहमार्गाचा विकास करण्यासाठी लागणारे गौणखनिज मिळवण्यासाठी जलसंधारणाच्या कामांची सांगड घालत निर्माण केलेल्या मोठ्या अाकाराच्या शेततळ्यामुळे खारपाणपट्ट्यात जलक्रांती येण्याचा मार्ग मोकळा झाला अाहे. दोन एकरांपासून ते सहा एकर अाकारमानाचे विशाल असे शेततळे खोदण्यात अाले असून, त्यात पाण्याचा संचय सुरू झाला अाहे.     

अकोला ः  रस्ता, लाेहमार्गाचा विकास करण्यासाठी लागणारे गौणखनिज मिळवण्यासाठी जलसंधारणाच्या कामांची सांगड घालत निर्माण केलेल्या मोठ्या अाकाराच्या शेततळ्यामुळे खारपाणपट्ट्यात जलक्रांती येण्याचा मार्ग मोकळा झाला अाहे. दोन एकरांपासून ते सहा एकर अाकारमानाचे विशाल असे शेततळे खोदण्यात अाले असून, त्यात पाण्याचा संचय सुरू झाला अाहे.     

जिल्ह्यात अकोला-अकोट मार्ग; तसेच अकोला-खंडवा लाेहमार्गाचे रुंदीकरण सुरू अाहे. हे काम करताना मोठ्या प्रमाणात गौणखनिजाची गरज निर्माण झाली होती. हा खनिज प्रशासनाला कोठूनही मिळवता अाला असता. मात्र, जाणीवपूर्वक तो मिळवताना जलसंधारणाच्या कामांशी सांगड घालण्यात अाली. यामुळे अाता अकोल्याहून अकोटकडे जाताना लागणाऱ्या अनेक गावांमध्ये जिकडे नजर जाईल तिकडे अवाढव्य स्वरूपाचे शेततळे नजरेस पडतात. मोठ्या तलावासारख्या दिसणाऱ्या या शेततळ्यांमध्ये नुकत्याच पडलेल्या पावसामुळे पाणी साठले असून, त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते अाहे. 

या कामांची नुकतीच खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे बांधकाम, अकोट-अकोला रोडचे रुंदीकरण, अकोला-खंडवा लाेहमार्गाचे विस्तारीकरण यासाठी गौणखनिजांची गरज भागविण्यासाठी या कामांशी जलसंधारणाच्या कामांची सांगड घालण्यात अाली अाहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड यांनी सातत्याने पाठपुरावा करीत हे सर्व शेततळे तयार केले. 

अकोट तालुक्यातील कालवाडी येथे सर्वांत मोठे सहा एकरांचे शेततळे बनविण्यात अाले अाहे. तरोडा या गावात चार एकरांवर तर वणी वारुळा येथे अडीच एकरांत, बळेगाव येथे अडीच एकर, तसेच दोन एकरांचे शेततळे खोदण्यात अाले. करोडी येथेही चार एकरांत, दनोरी शिवारात चार एकरांत अाणि देवरी शिवारात तीन एकरांत शेततळे खोदण्यात अालेले अाहेत. गायरान जमीन, नदीचे पात्र आणि शेतकऱ्यांच्या शेतात या शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

अकोट तालुक्यात खारनाल्याचे पाच किलोमीटर खोलीकरण व रुंदीकरणसुद्धा झाले अाहे. यातील गौणखनिज लाेहमार्गासाठी वापरण्यात आला आहे. सुमारे ५० फूट खोल करण्यात आलेल्या या शेततळ्यांमध्ये पावसाचे अाता १५ ते २० फुटांपर्यंत पाणी जमा झाले आहे, तर खारपाणपट्ट्यात काही ठिकाणी झरे लागल्याने हा जलसंचय वाढत आहे.

शेततळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचणार असल्याने या भागातील सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न मिटला अाहे. भविष्यात अपघात टाळण्यासाठी या शेततळ्यांना कुंपण घालण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेततळ्यांच्या भिंतीवरील माती बरेचदा खचते त्यामुळे त्या ठिकाणी खस गवत लावण्यात येणार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...