agrowon news in marathi, Rvikant tupkar says, farmers will take action for crop loan, Maharashtra | Agrowon

...अन्यथा बँक अधिकाऱ्यांना शेतकरी चोपतील ः तुपकर
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

बुलडाणा ः पीककर्ज पुरवठा करण्यास ज्या बँका टाळाटाळ आहेत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करा. अशा बँकांमध्ये प्रशासनाचे असलेले प्रत्येक विभागाचे बँक खाते काढून घेण्यात यावे. अन्यथा त्रस्त झालेले शेतकरी बँकेच्या अधिकाऱ्यांना चोप देतील, असा इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

स्वाभिमानी संघटनेेने शुक्रवारी (ता. १५) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की शेतकऱ्यांच्या पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. बँकांना पीककर्ज वाटप करण्याचे शासनाचे सक्त आदेश असताना बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

बुलडाणा ः पीककर्ज पुरवठा करण्यास ज्या बँका टाळाटाळ आहेत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करा. अशा बँकांमध्ये प्रशासनाचे असलेले प्रत्येक विभागाचे बँक खाते काढून घेण्यात यावे. अन्यथा त्रस्त झालेले शेतकरी बँकेच्या अधिकाऱ्यांना चोप देतील, असा इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

स्वाभिमानी संघटनेेने शुक्रवारी (ता. १५) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की शेतकऱ्यांच्या पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. बँकांना पीककर्ज वाटप करण्याचे शासनाचे सक्त आदेश असताना बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्हा सहकारी बँकेला राज्य बँकेकडून १५० कोटी रुपयांची गरज आहे. तथापि जिल्हा बँकेला अद्याप निधी मिळाला नाही. राष्ट्रीयीकृत बँकांची जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याची नैतिक जबाबदारी असताना जिल्ह्यातील २१ राष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंत केवळ पाच टक्के कर्जवाटप केले आहे.

दुसरीकडे जिल्हा बँकेच्या अखत्यारीत असलेल्या गावपातळीवरील सहकारी सोसायट्या कमीत कमी शेतकऱ्यांनाच कर्जवाटप करीत आहेत. सोसायट्यासुद्धा शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडे पाठवीत आहेत. मात्र राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना बँकेच्या दारात उभे करीत नाहीत. कागदपत्रामध्ये त्रुटी दाखवून शेतकऱ्यांना हाकलून लावत आहेत. जुन्या खातेदारांनाही बँक कर्जवाटप करीत नाहीत. शेतकऱ्यांना या बँकेकडून त्या बँकेत पाठविले जाते. राष्ट्रीयीकृत बँकेचे अनेक अधिकारी मस्तवालपणे वागत आहेत.

यावर्षी शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी बँकांचे कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. कर्जसुद्धा वेळेच्या आत मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेकडून तातडीने कर्जपुरवठा करण्याचे सक्त निर्देश देऊन शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. असे न झाल्यास आधीच त्रस्त झालेले शेतकरी बँकेच्या अधिकाऱ्यांना बँकेत घुसून चोप दिल्याशिवाय राहणार नाहीत, असेही तुपकर म्हणाले.

प्रशासकीय खाते बंद करा
शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बँकांमधून यवतमाळ व अकोला येथे जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय निधी काढला. असाच निर्णय बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन ज्या बँका कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करीत असतील अशा बँकातील प्रशासनातील महत्त्वाची बँक खाते बंद करून ते दुसऱ्या बँकेकडे वळती करून बँकाची आर्थिक कोंडी करावी, तरच हे ताळ्यावर येतील, असेही तुपकर यांनी म्हटले अाहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...