दूध पावडर निर्यातीसाठी ५० रुपये अनुदान द्या : खोत

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

पुणे ः राज्यातील अतिरिक्त दूध संकटामुळे घटलेल्या दर पूर्वपदावर आणण्यासाठी दूध पावडरच्या निर्यातीसाठी ५० रुपये प्रतिकिलाे अनुदान द्यावे, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी केंद्राकडे केली आहे. या प्रश्‍नी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लक्ष घालावे यासाठी त्यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.  खाेत यांनी मंत्री गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की महाराष्ट्रात २ काेटी लिटरपेक्षा अधिक दूध संकलन हाेत असून, हे दूध अतिरिक्त झाले आहे. परिणामी दुधाचे दर घटले आहेत. तसेच दूध पावडरचे दर राष्‍ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झाले आहेत. यामुळे दुधावर प्रक्रिया करून पावडर बनविणारे संघदेखील ताेट्यात आले आहेत. दुधावर जास्तीत जास्त प्रक्रिया हाेऊन पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलाे ५० रुपये अनुदान दिल्यास पावडरचा साठादेखील कमी हाेईल आणि दूध संघांना अधिकच्या दुधावर प्रक्रिया करणे शक्य हाेईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com