agrowon news in marathi, Sangli District Council strike in unpeopled | Agrowon

सांगली जिल्हा परिषदेत शुकशुकाट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सांगली : जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने मंगळवारी (ता. ७) एकदिवसीय लाक्षणिक संप केला. संपात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सुमारे दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. 

सांगली : जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने मंगळवारी (ता. ७) एकदिवसीय लाक्षणिक संप केला. संपात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सुमारे दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. 

सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी विविध संवर्गातील वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात. दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोग आश्‍वासन दिल्याप्रमाणे लागू करावा. तत्पूर्वी गणेशोत्सवात २५ हजार रुपये अग्रीम म्हणून द्यावे. २००५ नंतर शासन सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. आकृतिबंध सुधारणा करण्याच्या नावाखाली वर्ग तीन व चारची पदे कमी करण्याचा घाट घातला आहे, तो थांबवावा. 

जिल्हा परिषदेमध्ये करारावर किंवा कंत्राटी पद्धतीने दिलेल्या नेमणुका शासनाने नियमित कराव्यात. ग्रामविकास विभागाच्या अधिकारावर अतिक्रमण होऊ नये. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता जानेवारी २०१६ पासून द्यावा. अनुकंपा तत्त्वावर भरतीसाठी त्वरित शासन निर्णय व्हावा. यासह २३ मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने आज लाक्षणिक संप पुकारला. निदर्शनानंतर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. 
युनियनच्या संपात विविध संघटनांचा सहभाग होता.

युनियनचे जिल्हाध्यक्ष सुभाष मरिगुद्दी, कार्याध्यक्ष अशोक पाटील, दत्तात्रेय शिंदे, बजरंग संकपाळ, निळकंठ पट्टणशेट्टी, दादासाहेब पाटील, उज्ज्वला हिप्परकर, गीता शेंडगे, शुभदा चिटणीस, वीणा शिंगाडे, विद्या पाटील, धोंडिराम बेडगे, दत्ता पाटील, लक्ष्मण माने, एस. एल. कुंभार, मोहन गोसार्डी, चंद्रकांत दबडे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य या वेळी उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...