agrowon news in marathi, SEA says Decision of removing stock holding limit and hike in import duty on food oil is beneficial, Maharashtra | Agrowon

तेलबिया आयात शुल्कवाढ, साठामर्यादा हटविणे फायद्याचे ः एसईए
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

मुंबई ः केंद्र सरकारने नुकतेच आयात होणाऱ्या कच्चे आणि रिफाइंड खाद्यतेलाच्या आयात शुल्कात ५ ते १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्राने तेल उद्योग व व्यापाऱ्यांवर लादलेले साठा निर्बंधही काढले आहेत. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर होऊन शेतकरी व तेल उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. सरकारचा हा निर्णय फायद्याचा अाहे, असे सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर असोशिएशन आॅफ इंडियाने म्हटले आहे. 

मुंबई ः केंद्र सरकारने नुकतेच आयात होणाऱ्या कच्चे आणि रिफाइंड खाद्यतेलाच्या आयात शुल्कात ५ ते १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्राने तेल उद्योग व व्यापाऱ्यांवर लादलेले साठा निर्बंधही काढले आहेत. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर होऊन शेतकरी व तेल उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. सरकारचा हा निर्णय फायद्याचा अाहे, असे सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर असोशिएशन आॅफ इंडियाने म्हटले आहे. 

द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यंदा वेळेवर आणि चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ही शेतकरी आणि खाद्यतेल निर्मिती उद्योगासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच खाद्यबिया आणि खाद्यतेलाचा साठा नियंत्रणमुक्त केला आहे. तर नुकतेच सोयाबीन, सूर्यफूल, मोहरीवर्गीय कच्चे आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील आयातशुल्कात ५ ते १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीचा लाभ होणार असून, त्यांना हमीभाव मिळण्यासा मदत होईल. योग्य दर मिळाल्यास शेतकरी तेलबियांच्या पेरणीतही वाढ करण्याची शक्यता आहे. 

त्याचसोबत केंद्र सरकारने कच्चे आणि रिफाइंड पाम तेलाच्या आयात शुल्कात १० ते २० टक्के वाढ करावी. आयात कमी करून ‘‘मेक इन इंडिया’’ योजनेतून तेल उद्योगाला चालना देऊन मूल्य वर्धनावर भर द्यावा. तसेच नुकतेच बांगलादेशातून झालेल्या वनस्पती तेलाच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आयातीमुळे देशातील तेल उद्योगाला फटका बसला आहे. त्यातही पूर्वेकडील तेल उद्योगाला जास्त फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने बांगलादेशातून सध्या सुरू असलेली खाद्यतेल, वनस्पती तेलाची आयात थांबवावी आणि देशातील तेल उद्योगाला संरक्षण द्यावे, अशी विनंतीही केंद्राला केली आहे. 

दरम्यान, खाद्यतेलावरील आयात शुल्कवाढीचा निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारकडे यशस्वीपणे पाठपुरावा केल्याबद्दल असोसिएशनने राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे आभार मानले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...