डोंगरमाथ्यावर हेलिकॉप्टरद्वारे ‘सीड बॉम्बिंग’

दौलताबाद, ता. औरंगाबाद ः येथे भारतात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरद्वारे अवघड डोंगरमाथ्यावर एक लाख सीड बॉम्बिंगसाठी उड्डाण घेतलेले हेलिकॉप्टर.
दौलताबाद, ता. औरंगाबाद ः येथे भारतात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरद्वारे अवघड डोंगरमाथ्यावर एक लाख सीड बॉम्बिंगसाठी उड्डाण घेतलेले हेलिकॉप्टर.

दौलताबाद, जि. औरंगाबाद ः येथे भारतात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरद्वारे अवघड डोंगर माथ्यावर एक लाख सीड बॉम्बिंग (बीज गोळा) करण्याचा शुभारंभ गुरुवारी (ता. ५) विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर व मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात वन संपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. ही बाब लक्षात घेता वन विभाग व संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मागील वर्षी इको बटालियनची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून  दौलताबाद, अब्दीमंडी या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यंदाही या भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुरू आहे; परंतु डोंगर माथ्यावर जिथे मनुष्यबळ पोहाेचू शकत नाही, अशा ठिकाणी बीजारोपण केले, तर मोठ्या प्रमाणात डोंगर हिरवे होतील. शिवाय अशा ठिकाणी वन्य संपदा नष्ट करायला कुणी पोहाेचणार नाही, असे वन विभाग व लष्कराच्या लक्षात आले. ही संकल्पना अमलात आणण्यासाठी त्यांनी जवळपास चार लक्ष बिया घेऊन एक लाख सीड बॉम्ब तयार केले. हे सीड बॉम्ब हेलिकॉप्टरच्या साह्याने डोंगर माथ्यावर टाकण्याची संकल्पना त्यांनी पुणे येथील एलोरा एवीयएशन या कंपनीच्या साह्याने अमलात आणली. ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या समोरील सुलतान गड डोंगर माथ्यावर गुरुवारी हेलिकॉप्टरमधून सीड बॉम्बिंग करण्यात आले. यात मुख्य स्वरूपात सीताफळ बियांचा समावेश करण्यात आला होता. या वेळी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकार, वन विभागाचे मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन, इको बटालियनचे कर्नल वेंकटेश कुमार, मेजर अरुण कदम, वन संरक्षक एन. बी. गुदगे, उपवनसंरक्षक सतीश वडस्कर, सहायक वन संरक्षक ए. एम. सोनवणे, विभागीय वन अधिकारी यशपाल दिलपाक, एलोरा एव्हीएशनचे वाल्मीक केंद्रे, गौरव भारुका यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com