| Agrowon

जमीन प्रकारानुसार पीक जातींची निवड : चव्हाण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

शिल्लेगाव, जि. औरंगाबाद : गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावानंतर गुजरात राज्यात या किडीच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची चर्चा होत आहे. सर्वांनी मिळून केलेल्या उपाययोजनातून गुजरात पॅटर्नचा जन्म झाला. तशी उपाययोजना आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी केल्यास गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाचा पॅटर्न तयार होऊ शकतो, असे मत गांधेली येथील एमजीएम कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ तुषार चव्हाण यांनी व्यक्‍त केले. 

शिल्लेगाव, जि. औरंगाबाद : गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावानंतर गुजरात राज्यात या किडीच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची चर्चा होत आहे. सर्वांनी मिळून केलेल्या उपाययोजनातून गुजरात पॅटर्नचा जन्म झाला. तशी उपाययोजना आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी केल्यास गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाचा पॅटर्न तयार होऊ शकतो, असे मत गांधेली येथील एमजीएम कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ तुषार चव्हाण यांनी व्यक्‍त केले. 

शिल्लेगाव (ता. गंगापूर) येथे आयोजित चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. `ॲग्रोवन` आणि `स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजीज लि.` यांच्या संयुक्‍त विद्यमाने शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब वाघ होते. या वेळी महाधन, स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजीज लि. चे विभागीय विक्री व्यवस्थापक एच. टी. भिसे, कृषी सहायक वर्षा हिवाळे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, पेरणी करताना खासकरून कपाशीच्या जातींची जमिनीच्या मगदुराप्रमाणे निवड महत्त्वाची ठरते. पावसाचे प्रमाण कमी असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या जातींची निवड करावी. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. हे लक्षात घेऊन सेंद्रिय खते, जिवाणू संवर्धकांचा वापर करावा. किडींचे सर्वेक्षण आणि प्रादूर्भाव रोखण्याच्या पद्धतींचा वापर समजावून घ्यावा. रासायनिक कीडनाशकांचा शिफारशीनुसारच वापर करावा. पारंपरिक पिकांच्या बरोबरीने रेशीम शेती हादेखील चांगला पर्याय आहे. 

 स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजीज लि. चे विभागीय विक्री व्यवस्थापक एच. टी. भिसे यांनी खत वापराच्या तंत्रातील बदल समजावून सांगितले. ते म्हणाले की, खताची पिकाला उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामू नियंत्रित ठेवावा. शिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर केल्यास अपेक्षित पीक उत्पादन मिळविणे शक्य आहे.

कृषी सहायक हिवाळे यांनी शेततळे, अस्तरिकरण, पीकविमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती दिली. सूत्रसंचालन ॲग्रोवनचे वितरण प्रतिनिधी सुनील दाभाडे यांनी केले. तर ॲग्रोवनचे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी आभार मानले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी `सकाळ`चे बातमीदार विठ्ठल नरोडे, `स्मार्टकेम`चे जिल्हा विक्री अधिकारी अमोल बोडखे आदींनी प्रयत्न केले.

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...