agrowon news in marathi, seminar on soil enhancement in Solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात शुक्रवारी जमीन सुपीकतेवर चर्चासत्र
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

सोलापूर: शेतीतील नवीन तंत्रज्ञान, माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवणाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘सकाळ-ॲग्रोवन’ च्या वतीने शुक्रवारी (ता. २९) सोलापुरात ‘जमीन सुपीकता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेजवळील रंगभवन सभागृहात सकाळी दहा ते दोन या वेळेत हे चर्चासत्र होईल. यूपीएल कंपनीने हा कार्यक्रम प्रायोजित केला असून, ट्रेडकॉर्प हे सहप्रायोजक आहेत. जिल्ह्यातील ऊस, डाळिंब, द्राक्ष उत्पादकांसाठी हे चर्चासत्र एक पर्वणी ठरणार आहे. विशेषतः क्षारपड जमिनीमुळे जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा भागांतील ऊस उत्पादकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

सोलापूर: शेतीतील नवीन तंत्रज्ञान, माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवणाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘सकाळ-ॲग्रोवन’ च्या वतीने शुक्रवारी (ता. २९) सोलापुरात ‘जमीन सुपीकता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेजवळील रंगभवन सभागृहात सकाळी दहा ते दोन या वेळेत हे चर्चासत्र होईल. यूपीएल कंपनीने हा कार्यक्रम प्रायोजित केला असून, ट्रेडकॉर्प हे सहप्रायोजक आहेत. जिल्ह्यातील ऊस, डाळिंब, द्राक्ष उत्पादकांसाठी हे चर्चासत्र एक पर्वणी ठरणार आहे. विशेषतः क्षारपड जमिनीमुळे जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा भागांतील ऊस उत्पादकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यांच्यासाठी हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे.

जमीन सुपीकता, कोरडवाहू शेती पद्धती, जल-मृद संधारणातील या विषयातील तज्ज्ञ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मृदशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. अजितकुमार देशपांडे आणि जमीन सुपीकता या विषयावर सखोल अभ्यास असणारे कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर हे या चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

राज्यातील जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालल्याने ‘ॲग्रोवन’ने हे वर्ष जमीन सुपीकता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्या अंतर्गत पहिले चर्चासत्र पुण्यात झाले. दुसरे चर्चासत्र जळगावात आणि तिसरे नाशिकमध्ये झाले. या सर्व चर्चासत्रांना शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. शिवाय अशा चर्चासत्रांची मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांकडून होत असल्याने आता चौथे चर्चासत्र सोलापुरात होत आहे. यानंतर टप्प्याटप्याने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अशी चर्चासत्रे घेण्यात येणार आहेत. 

सोलापूर हा कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण, जिल्ह्यातील निम्मा भाग हा उजनी धरणामुळे बागायती झाला आहे. या पट्ट्यात ऊस, डाळिंब, द्राक्ष या पिकांत जिल्हा अग्रेसर आहे. विशेषतः डाळिंब आणि उसामध्ये जिल्ह्याची आघाडी आहे. पण नदीकाठच्या पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा या भागांत ऊस, डाळिंब उत्पादकांना क्षारपड जमिनीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्याशिवाय कोरडवाहू क्षेत्रातीलही विविध पिकांच्या उत्पादनवाढीसाठी जमिनीचा कस सुधारणे आवश्‍यक आहे. 

चर्चासत्राचे नियोजन असे... 

  • चर्चासत्र विषय ः जमीन सुपीकता 
  • स्थळ ः रंगभवन सभागृह, केशवनगर, जिल्हा परिषदेजवळ, सोलापूर
  • दिनांक, वेळ ः शुक्रवार, ता. २९ जून, सकाळी १० ते दुपारी २

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...