agrowon news in marathi, sensor will give information of Grain pests, Maharashtra | Agrowon

धान्याला कीड लागताच सेन्सर देणार माहिती
सचिन देशमुख
शनिवार, 23 जून 2018

सेन्सरद्वारे धान्याच्या किडीची पूर्वसूचना देणाऱ्या संशोधनाला पेटंट मिळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांसह शासकीय गोदामांसाठी हे संशोधन उपयुक्त ठरून धान्याची नासाडी थांबण्यास मदत होईल.
- डॉ. संजीव वाघ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कऱ्हाड

कऱ्हाड, जि. सातारा : साठवणूक केलेल्या ठिकाणी अथवा गोदामातील धान्याला कीड, वाळवी लागणे, धान्य सडण्याचे प्रकार सर्रास घडतात. अशा प्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीने येथील प्रा. डॉ. संजीव वाघ यांनी केलेले संशोधन उपयुक्त ठरणार आहे. सेन्सरच्या साह्याने साठवणूक केलेल्या ठिकाणी धान्य, डाळींना कीड लागताना त्यात होणाऱ्या केमिकल बदलाची नोंद सेन्सर घेत असल्याने कीडीला सुरवात होताच त्याची पूर्वसूचना गोदाम व्यवस्थापकाला मिळणे शक्‍य होणार आहे. लवकरच या संशोधनास पेटंटही मिळेल, असा विश्‍वास डॉ. वाघ यांनी व्यक्त केला.

अभ्यास व संशोधनासाठी जगभरातील अनेक देशांत फिरून आलेल्या येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञानचे विभागप्रमुख डॉ. वाघ यांनी केलेले संशोधन शेती व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. अनेक शेतकरी शेतातून पिकवलेले धान्य, डाळींची साठवण करून ठेवतात. व्यापाऱ्यांच्या तसेच शासकीय गोदामातही धान्याचा साठा मोठ्या प्रमाणात असतो.

मात्र, त्याच्या संरक्षणाची व्यवस्था नसल्याने गोदामात राहिलेल्या धान्याला कीड, वाळवी लागणे, धान्य सडण्याचे प्रकार घडतात. त्यातून शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. मात्र, त्यावर उपाययोजनाच नसल्याने व्यापारी, गोदाम व्यवस्थापकाकडे पर्याय नव्हता. 

मात्र, डॉ. वाघ यांनी त्यावर संशोधन करत सेन्सरच्या साह्याने साठवणूक केलेल्या ठिकाणी धान्य, डाळींना कीड लागताना त्यात होणाऱ्या केमिकल बदलाची नोंद सेन्सर घेत असल्याने कीडीला सुरवात होताच त्याची पूर्वसूचना गोदाम व्यवस्थापकाला मिळणे शक्‍य होणार आहे. त्याबाबत तंत्रज्ञानाची जोड देऊन गोदाम व्यवस्थापकासह अन्य काहींच्या मोबाईलवर तशी पूर्वसूचना देणारा संदेश मिळाल्यावर पुढील उपाययोजना करणे शक्‍य आहे.

या संशोधनात सेन्सरची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळेच धान्याला कीड, वाळवी लागण्यास सुरवात झाल्यावर सेन्सरद्वारे त्याचा संदेश मिळणे सहज शक्‍य होते. दिवसातून एकदा, दोनदा याप्रमाणे त्याला निर्देशित करेल त्यानुसार धान्याची स्थिती मोबाईलवर दाखवू शकेल. या संशोधनाचा प्रत्यक्षात वापर झाल्यावर मोठ्या प्रमाणात धान्याचे होणारे नुकसान रोखण्यास मदत होऊ शकते. हे संशोधन करणाऱ्या प्रा. डॉ. वाघ यांचे संशोधनाला पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....