agrowon news in marathi, server down of NHM schme, Maharashtra | Agrowon

‘एनएचएम'चा सर्व्हर डाउन, शेतकऱ्यांना डोकेदुखी
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ऑनलाइन पद्धतीचा वाढवलेला वापर योग्यच आहे. पण एवढ्या कमी कालावधीत आम्ही अर्ज कसे करावयाचे. या तांत्रिक अडचणीही विचारात घेतल्या पाहिजेत, सध्या ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची घाई सुरू असताना, तासनतास ई-सेवा केंद्रात ताटकळत किती वेळ बसायचे, यावर सरकारने मार्ग काढलाच पाहिजे.
- अंकुश पडवळे, प्रगतशील शेतकरी तथा अध्यक्ष कृषिक्रांती फार्मर्स क्‍लब, मंगळवेढा

सोलापूर ः राज्य शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानातील (एनएचएम) लाभासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पण अतिशय धीम्या गतीने ऑनलाइन सर्व्हर चालत असल्यामुळे महा-ई-सेवा केंद्रावर तासनतास शेतकऱ्यांना ताटकळत उभे राहण्याची वेळ येत  आहे. त्यातच खरिपाच्या पेरण्याच्या घाई, पीककर्जासाठी बॅंकांकडे हेलपाटे यात तो व्यस्त असताना, ई सेवा केंद्रावरील ‘सर्व्हर डाउन''मुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

‘एनएचएम’मधून यंदाच्या वर्षी कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाउस, पॉलिहाउस, हरितगृहात उच्च प्रतीचा भाजीपाला लागवड, हरितगृहातील फूल लागवड, २० एचपी ट्रॅक्‍टर, पॉवरऑपरेटर स्प्रेपंप, पॅकहाउस, शीतगृह, पूर्व शीतकरण गृह, शीतगृह, रेफर व्हॅन, रायनपनिंग चेंबर, अंळबी उत्पादन प्रकल्प, प्लॅस्टिक मल्चिंग, सामूहिक शेततळे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र (फळे, भाजीपाला, मसाला, हळद, मिरची, काजू, बेदाणा) मधुमक्षिकापालन आदी योजनांचा लाभ मिळणार आहे.

या अभियानासाठी पूर्वी जिल्हा स्तरावर अर्ज स्वीकृती करून शेतकऱ्यांना लाभ दिला जात होता; पण शासनाने यंदाच्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून लाभासाठी ‘पारदर्शकता'' आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण सध्या तो शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकत आहे. त्यात ई-सेवा केंद्रावरच हे अर्ज भरता येणार आहेत. त्यासाठी ‘हॉर्टिनेट'' या शासनाच्या वेबसाइटवरच अर्ज भरता येणार असल्याने एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांचे अर्ज डाउनलोड होत आहेत.

 त्यातच शेतकऱ्यांचा फोटो, सात-बारा उतारा, खाते उतारा, आधार कार्ड छायाकिंत प्रत, आधाल संलग्न बॅंक पासबुक, जातीचा दाखला, ॲप्लिकेशन फॉर्म आणि हमीपत्र ही सगळी कागदपत्रे स्कॅन करून फॉर्मसोबत दाखल करावयाची आहेत. त्यातही तास-दीड तास जातो आहे. त्यातच मध्ये सर्व्हर डाउन झाला की पुन्हा दीड-दोन तास थांबावे लागत आहेत. साहजिकच, एका केंद्रावर दिवसाला १० ते १५ शेतकरीही अर्ज भरु शकत नाहीत.

अर्ज भरल्यानंतर पुन्हा या अर्जाची प्रत ऑफलाइन पद्धतीने तालुका कृषी कार्यालयात जमा करावयाची आहे. ऑनलाइन अर्जासाठी १ ते २० जून एवढा कालावधी त्यासाठी दिला आहे. पण या कालावधीत जादा संख्येने शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल का? याबाबत साशंकताच आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...