agrowon news in marathi, Sharad Pawar, Government not have willpower for loan waiver scheme, Maharashtra | Agrowon

कर्जमाफीबाबत सरकारीची नियत चांगली नाही : शरद पवार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जून 2018

पुणे ः माेदी सरकारविराेधात समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. राज्य सरकारने ३५ हजार काेटींची कर्जमाफी केली मात्र, अद्याप ५० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. यावरून सरकारची नियत चांगली नसल्याचे स्पष्ट हाेत अाहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

पुणे ः माेदी सरकारविराेधात समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. राज्य सरकारने ३५ हजार काेटींची कर्जमाफी केली मात्र, अद्याप ५० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. यावरून सरकारची नियत चांगली नसल्याचे स्पष्ट हाेत अाहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा १९ व्या वर्धापन दिन आणि हल्लाबाेल आंदाेलनाच्या पश्‍चिम महाराष्‍ट्राच्या सांगता सभेत शरद पवार रविवारी (ता.१०) बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, अजित पवार, विजयसिंह माेहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मधुकर कुकडे, वंदना चव्हाण, प्रफुल्ल पटेल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित हाेते. 

श्री. पवार म्हणाले, की महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युती सरकारने ३५ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी केली. पण अद्याप ५० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. यावरून सरकारची नियतच चांगली नसल्याचे स्पष्ट दिसते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीविरोधात कोणीही विरोधी पक्षनेता नव्हता, तरीही समविचारी पक्ष एकत्र आले आणि जनता पार्टीची सत्ता आणली. त्यामुळे देशात पर्याय देण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येण्याची मानसिकता झाली आहे. यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असून, त्याची प्रक्रिया मी सुरू केली आहे. या प्रक्रियेत पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही सहभागी व्हावे.

‘‘यापूर्वी मतदानाची शंका काेण घेत नव्हते. मात्र आता शंका येऊ लागली आहे. मतदानासाठी मशिनच्या वापरातून निवडणुका जिंकायचे हे भाजपचे सूत्र आहे. भाजप सोडून सर्व पक्षांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे, आपण एकत्र येऊ निवडणूक आयोगाकडे जाऊ आणि इथून पुढे मशिनचा वापर न करता पारंपरिक पद्धतीनुसार मतदान घ्या, अशी मागणी करू. तसच धमकीचं पत्र आल्यावर माध्यमांशी बोलत नाही. त्यावर कायदेशीरपणे कारवाई केली जाते. त्यामुळे ही धमकी खरीच आहे का की धमकीच्या पत्रावरून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार आहे, असा संशय श्री. पवार यांनी व्यक्त केला. 

धनंजय मुंडे म्हणाले, की माेदी सरकारच्या यशाेगाथेची माहिती पक्षाध्यक्ष अमित शहा मान्यवरांना देत आहेत. मात्र पेट्राेल, डिझेल, गॅस दरवाढीची झळ ज्यांना बसत नाही अशा मान्यवरांना ते भेटत आहेत. आपण सरकारच्या अपयशगाथेची पुस्तिका घेऊन सर्वसामान्यांपर्यंत जाऊ, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पुढील वर्धापन दिन आपण सत्तांतर करून साजरा करू.

या वेळी जयंत पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, हसन मुश्रीफ, अण्णा डांगे, खासदार वंदना चव्हाण, मधुकर कुकडे यांनी मनाेगत व्यक्त केले.   

भुजबळ म्हणाले

  •  माझा न्यायदेवतेवर विश्वास होता आहे आणि तो राहील.  
  •  स्वत:ला निर्दोष सिद्ध करणार. 
  •  बचेंगे तो और भी लडेंगे..., हम बचे भी है... और लढते रहेंगे 
  •  राष्ट्रवादी काँग्रेस कधीही सोडणार नाही
  •  महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराची नियुक्ती मी केलेली नाही. 
  •  मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा, पाठिंब्यासाठी आेबीसींसह माेर्चात उतरणार
  •  सर्वच शेतमालावरील निर्यात बंदी उठवा.

इतर अॅग्रो विशेष
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन...रासायनिक कीडनाशकांना किटक प्रतिकारक होत असून,...
परागकणांचा मागोवा घेण्याची कार्यक्षम...दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील...
खानदेशात पाणीटंचाईच्या प्रस्तावात वाढजळगाव : खानदेशात पाणीटंचाईचे प्रस्ताव वाढत आहेत....
कडाक्याच्या थंडीने गव्हाच्या विविध...सातारा ः येथील वेण्णा तलाव परिसरात असलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरलापुणे: राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कणेरी मठावर देशातील पहिले डिव्हाइन...कोल्हापूर : हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची...
आंध्र प्रदेशातील एका कंपनीचा परवाना `...नागपूर ः आंध्र प्रदेशातील एका बियाणे कंपनीच्या...
आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी...मुंबई : खरीप हंगाम २०१८ मध्ये राज्यातील ५०...
मराठवाड्यात आज पावसाचा अंदाजपुणे : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात...
भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांची बाजू घेणारा...सेलू, जि. परभणी ः केंद्र तसेच राज्य सरकारमधील...
कापूस आयातीवर निर्बंध हवेतजळगाव ः आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय व अमेरिकन...
लेखी आश्वासनानंतर लाल वादळ शमलेनाशिक: प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभेने काढलेला...
आदर्श नैसर्गिक शेतीसह जपली पीक विविधता नांदेड जिल्ह्यातील मालेगांव (ता. अर्धापूर) येथील...
अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुष्काळावर दोन...मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
विदेशी भाज्यांमधून अल्पभूधारक...येळगाव (ता. जि. बुलडाणा) येथील विष्णू गडाख या...
शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित; सरकारचे...मुंबई : आश्वासन देऊनही वर्षभरापासून पूर्ण न...
वासंतीकरणाच्या प्रक्रियेतील तापमानाचे...वसंताच्या आगमनामुळे प्रत्येक वनस्पती किंवा...
मराठवाड्यात ‘रेशीम’ला रिक्त पदांचे...औरंगाबाद ः राज्याला रेशीम उद्योगात उदयोन्मुख...
खानदेशात पपई लागवडीत होणार निम्म्याने...जळगाव : खानदेशात आगाप पपई लागवडीला सुरवात झाली...
रशियाला द्राक्ष निर्यातीत ‘क्लिअरिंग’चा...नाशिक : भारतीय द्राक्षाचा रशिया मोठा आयातदार आहे...