राज्यातील कृषिक्रांतीचे वसंतराव नाईक हे अग्रदूत ः शरद पवार

मुंबई : किसन वीर साखर कारखान्याचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्काराने खासदार शरद पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुंबई : किसन वीर साखर कारखान्याचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्काराने खासदार शरद पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मुंबई ः महाराष्ट्रातील कृषिक्रांतीचे अग्रदूत, शेतकऱ्यांचे हितकर्ते, दीर्घकाळ सत्तेवर राहूनही निगर्वी राहणारे विरळ नेते म्हणून वसंतराव नाईक यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी राज्यात आधुनिक संकरित वाणांचा पुरस्कार आणि प्रसार केला. शेती उत्पादनवाढीच्या विविध योजना हाती घेतल्या. नाईक साहेबांनी चार कृषी विद्यापीठे सुरू केली. त्यांनी उभारलेल्या मुहूर्तमेढीचे सुपरिणाम आज दिसून येत आहेत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी रविवारी (ता. १) केले. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित कृषी पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.  या वेळी श्री. पवार म्हणाले, की १९७२ सालच्या दुष्काळात मुंबईत मृणाल गोरे व अन्य भगिनींनी अन्नधान्य कमतरतेवरून चळवळी उभ्या केल्या. नाईक साहेबांनी दक्षिणेकडील राज्यांना फोनवरून आवाहन केले. मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवले. परराज्यातून धान्य आणले. चळवळी थांबल्या. पण, राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नसल्याने ते अस्वस्थ होते. एके दिवशी शनिवारवाड्यासमोर मी महाराष्ट्राला अन्नधान्याबाबतीत स्वयंपूर्ण केले नाही तर मला फाशी द्या, असे जाहीर उद्गार त्यांनी काढले. नाईक साहेबांनी आधुनिक संकरित वाणाचा पुरस्कार आणि प्रसार केला. उत्पादन वाढीच्या विविध योजना हाती घेतल्या. आम्हाला कामाला प्रेरणा दिली. नाईक साहेबांनी वि. स. पागे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापून रोजगार हमी योजना तयार केली. राज्याच्या भल्यासाठी नाईक साहेब केंद्रीय नियोजन मंडळासमोर स्वत:ची मते रोखठोक मांडत. अगदी विरोधी पक्षनेत्याप्रमाणे. वृत्तपत्रांनीदेखील त्याची दखल घेतली. ‘‘नाईक साहेबांनी चार कृषी विद्यापीठे सुरू केली. त्यांनी उभारलेल्या मुहूर्तमेढीचे सुपरिणाम आज दिसून येतात. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातोय. त्यांच्या स्मृतीला ही उचित आदरांजली आहे,’’ असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

पुरस्कार्थी : 

  •  सामाईक पुरस्कार ः किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना (भुईंज, ता.वाई, सातारा), अध्यक्ष मदन प्रतापराव भोसले
  •  कृषी पुरस्कार ः अरुण निंबाजी देवरे यांना (मु.पो.दाभाडी, ता.मालेगाव, जि.नाशिक) 
  •  कृषिप्रक्रिया पुरस्कार ः कु. नेहा दत्तात्रय घावटे यांना (मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) 
  •  कृषी साहित्य पुरस्कार ः डॉ एस. जी. बोरकर (सहयोगी अधिष्ठाता, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी)
  •  कृषी पत्रकारिता पुरस्कार ः लहू काळे, (पुणे)
  •  कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार ः प्रवीण रामनाथ संधान (माॅन्सून फूड्स, मु.चिंचखेड, ता.जि.नाशिक)
  •  फलोत्पादन पुरस्कार ः धीरज एस. जुंधारे (मु.हाटला, ता.काटोल, जि. नागपूर)
  •  भाजीपाला उत्पादन ः श्रीमती राहिबाई पोपेरे (मु.कोंभाळणे, ता.अकोले, मु. आंबेगवण, जि.अहमदनगर)
  •  फुलशेती ः महेश रघुनाथ धुम (मु.गरदवाडी, ता.जव्हार, जि.पालघर)
  •  सामाजिक वनीकरण ः अजित वर्तक (महाराष्ट्र वृक्ष संवर्धनी, शनिवार पेठ, पुणे)
  •  पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय ः श्रीमती काशिबाई मोरे (ता.मुडशिंगी, ता.करवीर, जि.कोल्हापूर)
  •  जलसंधारण ः मिलिंद तुकारामजी भगत (सद्भावना ग्रामीण विकास संस्था, वर्धा)
  •  पर्यावरण ः संजय पाटील (बायफ, मित्र रिसर्च फाऊंडेशन, वारजे, पुणे).
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com