agrowon news in marathi, Shivendrasinh Raje says, importance of Agrowon in farmers life, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे अनन्यसाधारण महत्त्व : शिवेंद्रसिंहराजे भोसले
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असून, पुढील काळात जिल्हा बॅंक व ‘ॲग्रोवन’ यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रांचे अायोजन करणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे केले.

सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असून, पुढील काळात जिल्हा बॅंक व ‘ॲग्रोवन’ यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रांचे अायोजन करणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे केले.

जिल्हा बॅंकेतर्फे शेतकरी मंडळे व बॅंकेच्या शाखांत दैनिक ॲग्रोवनचे अंक सुरू करण्यात आले आहेत, याकरिताचा धनादेश उपाध्यक्ष आमदार भोसले यांनी ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्याकडे शुक्रवारी (ता. १५) सुपूर्द केला, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी संचालक आमदार बाळासाहेब पाटील, दादाराजे खर्डेकर, विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, नितीन पाटील, प्रकाश बडेकर, दत्तानाना धमाळ, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे, ॲग्रोवन वितरण व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक संजय जाधव, मधुकर जाधव, व्यवस्थापक सुजित शेख आदी उपस्थित होते.

आमदार भोसले म्हणाले, ‘‘जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधारस्तंभ आहे. सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी बॅंक कार्यरत आहे. शेतकऱ्यांना जास्तीतजास्त शेतीविषयक माहिती उपलब्ध व्हावी, यादृष्टीने हा उपक्रम हाती घेतला आहे.’’ 

माजी आमदार पाटणकर म्हणाले, ‘‘दैनिक ॲग्रोवनमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढ झाली आहे. यापुढे शेतमालाची विक्री, प्रक्रिया उद्योग, तसेच वनस्पती लागवड व विक्री व्यवस्था याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.’’
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सहकारात काम करणारी सर्वोत्कृष्ट बॅंक आहे. शेतकऱ्यांसाठी या बॅंकेच्या माध्यमातून भविष्यात शेती उत्पादनात वाढ, विक्री व्यवस्था, औषधी वनस्पती याविषयी चर्चासत्राचे संयुक्तरीत्या अयोजन करू.’’

बॅंकेने नाबार्डच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट ३०० शेतकरी मंडळांना व जिल्ह्यातील सर्व शाखांना दैनिक ॲग्रोवनचे अंक सुरू केले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सरकाळे यांनी आभार मानले.

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...