देशांतर्गत बाजारात दर्जेदार रुईचा तुटवडा

रुईची मागणी चीनकडून अलीकडे वाढली आहे. त्यांचा संरक्षित साठा फक्त २० टक्के आहे. तो साठा करण्यासाठी चीनने भारतीय कापसाला पसंती दिली आहे. डॉलरही वधारतच आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे. - अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
देशांतर्गत बाजारात दर्जेदार रुईचा तुटवडा
देशांतर्गत बाजारात दर्जेदार रुईचा तुटवडा

जळगाव ः देशातील सूतगिरण्यांची गतीने सुरू असलेली धडधड, डॉलरच्या दरांनी गाठलेली उच्चांकी पातळी, अमेरिका व चीनमधील व्यापार युद्ध आदी कारणांमुळे कापसाच्या दरात मागील चार दिवसांमध्ये क्विंटलमागे ३५० रुपयांनी वाढ झाली आहे. अशातच दर्जेदार रुईच्या तुटवड्याची समस्या देशांतर्गत सूतगिरण्या व मोठ्या मिलांना भेडसावू लागली आहे. कापूस दरवाढ रुई उत्पादकांना लाभदायी ठरेल. याच वेळी देशातील फक्त २० टक्के कापूस उत्पादकांना या दरवाढीचा लाभ मिळेल, असे जाणकार व तज्ज्ञांनी म्हटले आहे.  

सध्या कापसाचे (दर्जेदार किंवा पहिल्या वेचणीचा) दर ५१५० रुपये प्रतिक्विंटल आहे. मागील आठवड्याच्या सुरवातीपर्यंत हे दर ४८०० रुपये प्रतिक्विंटल होते. तर फरदडचे दर यापेक्षा कमी होते. देशात सध्या १२२ ते १२५ लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे. हा कापूस गुजरात, महाराष्ट्र व तेलंगणात असून, आता झालेली दरवाढ फक्त २० टक्के कापूस उत्पादकांना लाभदायी ठरणार आहे. रुई उत्पादक किंवा जिनींग चालकांना या दरवाढीचा लाभ मिळेल. कारण रुईचे दर प्रतिखंडी (३५६ किलो रुई) ४०५०० रुपयांवरून ४२५०० रुपयांवर पोचले आहेत. डॉलरचे दर जानेवारीनंतर वधारत असून, ते या साडेचार ते पाच महिन्यांमध्ये ६३.५२ रुपयांवरून ६७.५२ रुपयांपर्यंत पोचले आहेत. दोन दिवसांपूर्वी डॉलर ६८ रुपयांपर्यंत होता. रुपया कमकुवत दिसत असल्याने परकीय कापूस आयातदारांना भारतीय रुई परवडत आहे. 

देशांतर्गत मागणीही वाढली देशांगर्तत बाजारात रुईचा तुटवडा जाणवू लागला आहे. कारण देशात ३६० लाख गाठींचे उत्पादन होणार असून, देशातील मिलमधील वापर, इतर उद्योगांची गरज भागविण्यासाठी किमान ३६० लाख गाठींची गरज आहे. उत्तरेकडे कापडमिला जानेवारीत गतीने सुरू झाल्या. सुताची निर्यात तीन टक्के वाढल्याने दाक्षिणात्य सूतगिरण्यांमध्येही रुईची मागणी अधिक आहे. देशात सुमारे २१०० सूतगिरण्यांची धडधड सुरू आहे. आयात सुमारे १८ लाख गाठींची आयात. डॉलर वधारल्याने परदेशी रुई ५४००० रुपयांना पडत आहे. तर भारतीय रुई परकीय रुईच्या तुलनेत सद्यःस्थितीत सुमारे १०००० रुपयांनी स्वस्त पडत असल्याने देशांतर्गत बाजारातील आयातीवरही परिणाम मागील महिन्यातच झाला आहे.  अशातच गाठींचा शिलकी साठा किती राहील, हादेखील प्रश्‍न देशातील सूतगिरण्यांसमोर आहे. कारण रुईची मागणी व पुरवठा याचे गणित बिघडले आहे, असे सांगण्यात आले. 

बांगलादेश मोठा आयातदार आयात व निर्यात सुरू आहे. परंतु रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत असल्याने निर्यात वाढली आहे. आजघडीला ६७ लाख गाठींची निर्यात देशातून झाली आहे. आशियाई देशांमध्ये यातील ९० टक्के गाठींची पाठवणूक झाली असून, बांगलादेश हा सर्वात मोठा खरेदीदार ठरला आहे. ३० सप्टेंबर २०१८ अखेर किमान ८० लाख गाठींची निर्यात देशातून होईल, असे सांगण्यात आले.  देशातील कापूस निर्यात दृष्टिक्षेपात  (निर्यात लाख गाठींमध्ये)

वर्ष निर्यात
२०१४ ६२
२०१५ ५४
२०१६ ५६
२०१७ ५५
२०१८ (मेअखेर)---६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com