शेतीमालाला योग्य हमीभाव देण्याची वेळ आली : श्रीनिवास पाटील

पुणे ः ‘देशभक्त बाळासाहेब भारदे पुरस्कार' पाशा पटेल यांच्यासह डॉ. के. पी. विश्‍वनाथा, आमदार बच्चू कडू यांना राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे ः ‘देशभक्त बाळासाहेब भारदे पुरस्कार' पाशा पटेल यांच्यासह डॉ. के. पी. विश्‍वनाथा, आमदार बच्चू कडू यांना राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुणे ः कृषितज्ज्ञांना ‘इक्वेशन’ करायला काय लागत नाही. या इक्वेशनमध्ये न अडकता राज्य सरकारकडून शेतीमालाला योग्य हमीभाव देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे पाेट नाही तर खिसे भरले पाहिजेत, असे काम करा, अशी अपेक्षा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पुरस्कारार्थ्यांकडून व्यक्त केली. निमित्त हाेते देशभक्त बाळासाहेब भारदे पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे.  पद्मभूषण बाळासाहेब भारदे प्रतिष्ठानच्या वतीने ‘देशभक्त बाळासाहेब भारदे पुरस्कार' राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना प्रदान करण्यात आला. या वेळी त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय भारदे आदी उपस्थित होते.  राज्यपाल पाटील म्हणाले, की बाळासाहेब भारदे यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशभक्ती आणि स्वातंत्र्योत्तर देशरचना केली. महाराष्ट्राचे पहिले सहकारमंत्री असताना त्यांनी सहकार क्षेत्राची पायाभरणी केली. सहकार क्षेत्राला सरकारचे हस्तांदोलन असावे हस्तक्षेप नको अशी त्यांची भूमिका होती. कृषी मूल्य आयोग हीदेखील त्यांची संकल्पना होती. शेतकऱ्याने पेरले ते उगवत नाही अशी परिस्थिती सध्या झाली आहे. ज्यांचे पेरलेले उगविले त्याला हमीभाव कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून दिला पाहिजे. पाशा पटेल म्हणाले, की गेली ३० वर्षे देशभरात फिरून शेतकऱ्यांशी संवाद साधत असून, त्यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करीत आहे. विराेधी पक्षात असताना अांदाेलनांद्वारे सरकारशी संघर्ष करत, शेतीमालाला चांगला दर मिळण्यासाठी प्रयत्न केला. आता सत्तेत असताना सरकारला कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून हमीभाव देण्यासाठी ‘सोल्यूशन' देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. बच्चू कडू म्हणाले, की निवडणुकीमध्ये जात, धर्म आठवणाऱ्यांना अपंगांना मदत करण्यासाठी जात का आठवत नाही. ज्या दिवशी लोक मंदिर आणि मशिदीत जाण्यापेक्षा रुग्णसेवेसाठी रुग्णालयात जातील त्याचदिवशी देशात क्रांतीची पाऊलवाट बदलेल.  डॉ. विश्‍वनाथा म्हणाले, की आम्ही शेतकऱ्यांना नवनवीन संशाेधनाद्वारे सर्वाेत्तम देण्याचा प्रयत्न करत असताे. भारदे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने माझी आणि विद्यापीठाची कृषी संशाेधनासाठीच्या जबाबदारीत वाढ झाली आहे. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील यांनी मनाेगत व्यक्त केले. तर अजय भारदे यांनी प्रास्ताविक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com