agrowon news in marathi, Sisan committee demands special parliament session on farmers issue, Maharashtra | Agrowon

शेतकरीप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा : किसान समिती
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नवी दिल्ली  ः देशात सतत वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि इतर शेतीसंबंधी समस्यांनी शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. 

नवी दिल्ली  ः देशात सतत वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि इतर शेतीसंबंधी समस्यांनी शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. 

व्ही. एम. सिंग (निमंत्रक), माजी खासदार हसन मोल्ला, खासदार राजू शेट्टी, माजी आमदार डॉ. सुनीलम, अतुल अंजन, योगेंद्र यादव आदी किसान संघर्ष समन्वय समितीच्या सदस्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट सोमवारी (ता. २८) घेतली. या वेळी सदस्यांनी राष्ट्रपतींशी देशातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा केली.

समितीचे सदस्य अतुल अंजन म्हणाले, की किसान संघर्ष समन्वय समितीच्या सदस्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना देशातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि इतर शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी निवेदन देण्यात आले. तसचे शेतकरी आत्महत्या आणि इतर शेतीसंबंधी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली आहे. 

राष्ट्रपतींची चर्चा केल्यानंतर समितीच्या सदस्यांनी सांगितले, की राष्ट्रपती यांनी समितीचे म्हणणे सविस्तरपणे ऐकले आणि मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने लढण्यासाठी देशातील १९३ शेतकरी संघटना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीशी जोडल्या गेल्या आहेत.

देशातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी १० हजार किलोमीटरचा प्रवास करून, शेतकऱ्यांशी ५०० बैठका घेऊन किसान संघर्ष समितीने दोन उपाय प्रभावीपणे मांडले आहेत. कर्जापासून मुक्त आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त किमान भाव मिळण्याची शाश्वती, असे दोन उपाय शेतकऱ्यांच्या समस्येवर प्रभावी ठरू शकतात, असे आम्ही पत्रात म्हटले आहे.  

‘‘भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर मागील चार वर्षांत देशातील शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिघडतच आहे. पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांच्या समस्यांना गांभीर्याने पाहत नाहीत. शेतकऱ्यांना भाजप सरकारच्या काळात नुकसानभरपाईसुद्धा वेळेत मिळत नाही,’’ असे शेतकरी नेते थेटे म्हणाले.
 

इतर अॅग्रो विशेष
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...
मराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...