agrowon news in marathi, Soil Enhancement Seminar in Nashik on Wednesday, Maharashtra | Agrowon

जमीन सुपीकतेविषयी नाशिकला बुधवारी चर्चासत्र
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

नाशिक ः शेती व्यवसाय लाभदायी होण्यासाठी कायम शेतकऱ्यांसोबत राहणाऱ्या, तसेच शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील कल यांबाबतची उपयुक्त माहिती दररोज शेतकऱ्यांपर्यंत पोचवणाऱ्या ‘ॲग्रोवन’च्या वतीने येत्या बुधवारी (ता. २०) नाशिकला ‘जमीन सुपीकता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येथील नेहरू गार्डन नजीकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात चर्चासत्र सकाळी १० ते दुपारी २ यादरम्यान होईल. यारा फर्टिलायझर्स हे या चर्चासत्राचे प्रस्तुतकर्ते असून, कॅन बायोसिस हे सहप्रायोजक आहेत. 

नाशिक ः शेती व्यवसाय लाभदायी होण्यासाठी कायम शेतकऱ्यांसोबत राहणाऱ्या, तसेच शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील कल यांबाबतची उपयुक्त माहिती दररोज शेतकऱ्यांपर्यंत पोचवणाऱ्या ‘ॲग्रोवन’च्या वतीने येत्या बुधवारी (ता. २०) नाशिकला ‘जमीन सुपीकता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येथील नेहरू गार्डन नजीकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात चर्चासत्र सकाळी १० ते दुपारी २ यादरम्यान होईल. यारा फर्टिलायझर्स हे या चर्चासत्राचे प्रस्तुतकर्ते असून, कॅन बायोसिस हे सहप्रायोजक आहेत. 

जमिनीचे आरोग्य व पीक पोषण या विषयातील तज्ज्ञ तथा पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, जमीन सुपीकता या विषयासंबंधी आयुष्यभर काम करीत असलेले कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, तब्बल २४ वर्षे नैसर्गिक शेतीचे यशस्वी प्रयोग करणारे सुभाष शर्मा हे मान्यवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. 

राज्यातील जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चालल्याने शेती संकटात आली आहे. हे लक्षात घेऊन ‘ॲग्रोवन’ने हे ‘जमीन सुपीकता वर्ष’ जाहीर केले आहे. त्याअंतर्गत पहिले चर्चासत्र पुण्यात झाले. दुसरे चर्चासत्र जळगावात झाले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला व त्याचबरोबर राज्यात ठिकठिकाणी अशी चर्चासत्रे घेऊन शेतकऱ्यांना या विषयाचे मार्गदर्शन करावे, अशी मागणी विविध भागांतून होऊ लागली आहे. त्यानुसार हे तिसरे चर्चासत्र नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नाशिक येथे होत आहे. राज्यात अन्य ठिकाणीही टप्प्याटप्प्याने, अशी चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. 

नाशिक जिल्ह्यात पिकांची विविधता आहे. कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला उत्पादनात नाशिक देशात अग्रेसर आहे. नाशिक भागातील शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात देशात सर्वांत पुढे असून, तो देशातील सर्वात प्रगतिशील मानला जातो. परंतु अलीकडे जमिनीची सुपीकता ढासळत चालली आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असतानाचा खते व पाण्याचा अनियंत्रित वापर आदी कारणांमुळे कमी उत्पादन, क्षारपड जमिनी, नापिकी अशा समस्या शेतकरी राजासमोर आ वासून उभ्या आहेत.

येथील अभ्यासू शेतकरी या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी धडपड करीत आहे. याच पार्श्‍वभूमीवर जमिनीची सुपीकता या विषयावर होणारे चर्चासत्र उपयुक्त ठरणारे असेल. 
यापूर्वी ‘ॲग्रोवन''ने पुण्यात वर्धापन दिनानिमित्त जमीन सुपीकता यासंबंधी चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले होते. त्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी राजाला जमीन सुपीकता टिकविण्याच्या, वाढविण्याच्या संकल्पना मिळाव्यात या दृष्टीने या चर्चासत्राचे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजन केले आहे. प्रवेश विनामूल्य असणार आहे.

चर्चासत्राचे नियोजन असे
    चर्चासत्र ः जपाल माती, तर पिकतील मोती 
    स्थळ ः प.सा. नाट्यगृह, नेहरू गार्डनजवळ, शालिमार, नाशिक. 
    दिनांक व वेळ ः बुधवार, २० मे २०१८ . सकाळी १० ते दुपारी २ .

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...