agrowon news in marathi, Solapur APMC result against BJP , Maharashtra | Agrowon

सोलापूर बाजार समितीत सहकारमंत्र्यांच्या पॅनेलचा धुव्वा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या मंगळवारी (ता.3) झालेल्या मतमोजणीत सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला शेतकऱ्यांनी स्पष्टपणे नाकारत पुन्हा एकदा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या हातात चाव्या दिल्याचे दिसून आले. संचालक मंडळाच्या 18 जागांपैकी जवळपास 16 जागा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडीला मिळाल्या, तर उर्वरित दोन जागा सहकारमंत्री देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सिद्धरामेश्‍वर परिवर्तन पॅनेलला मिळाल्या आहेत.

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या मंगळवारी (ता.3) झालेल्या मतमोजणीत सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला शेतकऱ्यांनी स्पष्टपणे नाकारत पुन्हा एकदा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या हातात चाव्या दिल्याचे दिसून आले. संचालक मंडळाच्या 18 जागांपैकी जवळपास 16 जागा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडीला मिळाल्या, तर उर्वरित दोन जागा सहकारमंत्री देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सिद्धरामेश्‍वर परिवर्तन पॅनेलला मिळाल्या आहेत.

सोरेगाव येथील एसआरपी कॅम्पमध्ये मंगळवारी (ता.3) सकाळी आठ वाजेपासून निवडणुकीची ही मतमोजणी सुरू झाली. मतपत्रिकेवर शिक्‍क्‍याद्वारे मतदान झाल्याने मतमोजणीला वेळ गेला. सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणीचे निकाल पूर्ण झाले नव्हते; पण दुपारपर्यंत निवडणुकीचे कल हाती आले होते. पहिला निकाल हमाल-तोलार मतदारसंघातील शिवानंद पुजारी यांच्या विजयाने सुरू झाला.

त्यानंतर हिरज गणातील लागला, या ठिकाणी कॉंग्रेस नेते, माजी आमदार दिलीप माने आणि सहकारमंत्री देशमुख यांच्या पॅनेलचे श्रीमंत बंडगर यांच्यात लढत झाली. त्यात श्री. माने यांनी 2251 मते मिळवली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी श्री. बंडगर यांनी 930 मते घेतली. 1321 मते मिळवत श्री. माने या ठिकाणी विजयी झाले. त्यानंतर बाळेगणात श्री. माने यांच्या भगिनी विजया भोसले यांनीही 1512 मते मिळवत बाजी मारली. या ठिकाणी त्यांच्या विरोधात सहकारमंत्री देशमुख पॅनेलच्या मेनका राठोड यांनी 712 मते मिळवली.

त्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत साधारण आठ निकाल हाती आले. त्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेच बाजी मारली. उत्तर सोलापुरातून पाकणी गणातून शिवसेना नेते प्रकाश वानकर हे 1993 मते घेत विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी सुनील गुंड यांना 1274 मते मिळाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख उभे असलेल्या कुंभारीत श्री. देशमुख यांनी एकतर्फी विजय मिळवला. श्री. देशमुख यांना 3023 मते मिळाली. त्यांच्या विरोधातील शिरीष पाटील यांना 779 मते मिळाली. होटगी आणि कंदलगाव या दोन्ही गणात मात्र सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलचे अनुक्रमे रामप्पा चिवडशेट्टी आणि अप्पू पाटील विजयी झाले. या दोन जागा वगळता मंत्री देशमुख यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

बाजार समितीच्या निवडणुकीत अगोदरपासूनच चुरस लागली होती. सहकारमंत्री देशमुख यांच्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी आणि बाजार समितीचे तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने यांनी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यातच श्री. देशमुख यांनी श्री. माने यांच्यासह तत्कालीन संचालकांवर गैरव्यवहारप्रकरणी ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुन्हे दाखल करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला; पण श्री. माने यांनीही राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेनेच्या नेत्यांना एकत्र आणत पॅनेल उभा करून मंत्री देशमुख यांच्यासमोर आव्हान निर्माण केले; पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत.

भाजपचे नेते, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनाही त्यांनी सोबत घेत पॅनेलमध्ये स्थान दिले. श्री. माने यांची ही मुत्सद्देगिरीच या आघाडीला विजयापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली. त्यातच बाजार समितीचे मतदानही पन्नास टक्‍क्‍यापर्यंत कमीच झाले, या सगळ्या पार्श्‍वभूमीवर सहकारमंत्री देशमुख यांचे एकखांबी नेतृत्व सामूहिक ताकदीपुढे निष्फळ ठरले; तसेच पहिल्यांदाच या निवडणुकीत शेतकऱ्यांना मताधिकार दिल्याने आणि भ्रष्टाचारी संचालकांवर गुन्हे दाखल झाल्याने शेतकरी आपल्या बाजूने राहतील, असा सहकारमंत्र्यांचा विश्‍वास या निवडणुकीत सपशेल खोटा ठरला.

गणनिहाय विजयी उमेदवार याप्रमाणे ः कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाप्रणित सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडी ः जितेंद्र साठे (कळमण), विजयुकमार देशमुख (कुंभारी), दिलीप माने (हिरज), इंदुमती अलगोंडा (मंद्रूप), प्रकाश चोरेकर (नान्नज), प्रकाश वानकर (पाकणी), बाळासाहेब शेळके (औराद), विजया भोसले (बाळे), नामदेव गवळी (मार्डी), राजकुमार वाघमारे (बोरामणी), अमर पाटील (कणबस), श्रीशैल नरोळे (मुस्ती), वसंत पाटील (भंडारकवठे), केदार उंबरजे (व्यापारी गण), बसवराज इटकळे (व्यापारी गण), शिवानंद पुजारी (हमाल-तोलार गण).

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सिद्धेश्‍वर परिवर्तन पॅनेल ः रामप्पा चिवडशेट्टी (होटगी) आणि अप्पू पाटील (कंदलगाव)

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...