agrowon news in marathi, state government will implement honey bee friend plan, Maharashtra | Agrowon

​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र उपक्रम
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 मे 2018

पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते पेस्टकंट्रोल करून पाडले जाते, ते नष्ट केले जाते. मधुमक्षिकांबद्दल असलेली अपुरी माहिती आणि गैरसमाज यांतून हे प्रकार वाढले आहे. मधुमक्षिकांचे संरक्षण व संवर्धन व्हावे याबरोबरच मधुमक्षिकापालन या उद्योगासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम राबविला जाणार असल्याची घोषणा मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी केली.

पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते पेस्टकंट्रोल करून पाडले जाते, ते नष्ट केले जाते. मधुमक्षिकांबद्दल असलेली अपुरी माहिती आणि गैरसमाज यांतून हे प्रकार वाढले आहे. मधुमक्षिकांचे संरक्षण व संवर्धन व्हावे याबरोबरच मधुमक्षिकापालन या उद्योगासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम राबविला जाणार असल्याची घोषणा मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी केली.

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत नुकताच २० मे हा दिवस जागतिक मधुमक्षिका दिन म्हणून जाहीर करण्यात आला. त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व हातकागद संस्था यांच्च्या वतीने हातकागद संस्थेच्या आवारात असलेल्या महाखादी परिसरात पहिल्या जागतिक मधुमक्षिका दिनाचे औचित्य साधत तीनदिवसीय मधुमक्षिकापालन महोत्सवाचे १९ ते २१ मे या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन श्री. चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी चोरडिया बोलत होते.

या वेळी केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक दीप वर्मा, मध उद्योग तज्ज्ञ नाना क्षीरसागर, मध उद्योजक प्रशांत सावंत, सारिका सासवडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अनिल खेडकर, हातकागद संस्थेचे संचालक रमेश सुरुंग आदी या वेळी उपस्थित होते.

श्री. चोरडिया म्हणाले, की मधुमक्षिका हा मनुष्याला उपयुक्त असा कीटक आहे. मधुमक्षिकांकडून आपल्याला तब्बल १९ प्रकारचे मध मिळतात इतकेच नाही, तर मधुमक्षिका पालनाशिवाय आपण त्याच्याशी संबंधित तब्बल ४६ प्रकारचे उद्योगही करू शकतो. मधुमक्षिकांची हीच उपयुक्तता आपण सामान्य नागरिकांना समजावून सांगण्यासाठी ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम आम्ही हाती घेत आहोत. या अंतर्गत प्राणिमित्र, सर्पमित्र यांसारखेच मधुमक्षिकांच्या रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील असून, त्यासाठी लवकरच कॉल सेंटरची उभारणी करण्यात येईल. याबरोबरच पुणे शहराला ‘हनी बी फ्रेंडली सिटी’ करण्यासाठीदेखील आम्ही प्रयत्न करणार आहोत.

महाबळेश्वर येथे दोन एकर जागेत लवकरच देशातील पहिले ‘हनी बी पार्क’ सुरू करण्याची आमची योजना असून, यामध्ये मधुमक्षिकापालन कसे करावे, कसे केले जाते, त्याच्या पद्धती, मध कसा काढावा, मधाचे पोळे कसे असते, मधुमक्षिकांचे काम कसे चालते यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मधुमक्षिकांबद्दलच्या जागृती बरोबरच या ठिकाणी एक टुरिस्ट हब कम माहिती केंद्र बनविण्याचा आमचा हा एक प्रयत्न असेल, असेही चोरडिया यांनी सांगितले.

मधुमक्षिका दिनानिमित्त तीनदिवसीय मधमाश्यापालन महोत्सवाविषयी हातकागद संस्थेचे संचालक रमेश सुरुंग यांनी केले सांगितले. एन. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले, तर रमेश सुरुंग यांनी आभार मानले.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...