agrowon news in marathi, stop sugarcane sowing, maharashtra | Agrowon

ऊस लागवड थांबवा : उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांचे शेतकऱ्यांना आवाहन !
वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

लखनौ, उत्तर प्रदेश  : चालू गाळप हंगामात देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्यांकडील वाढती थकबाकी आणि २०१७-१८ च्या हंगामात उत्तर प्रदेशात उसाचे झालेले विक्रमी उत्पादन यामुळे येथील खासगी साखर कारखान्यांनी २०१८-१९ मध्ये ऊस लागवड न करण्याचे शेेतकऱ्यांना आवाहन केले आहे. 

लखनौ, उत्तर प्रदेश  : चालू गाळप हंगामात देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्यांकडील वाढती थकबाकी आणि २०१७-१८ च्या हंगामात उत्तर प्रदेशात उसाचे झालेले विक्रमी उत्पादन यामुळे येथील खासगी साखर कारखान्यांनी २०१८-१९ मध्ये ऊस लागवड न करण्याचे शेेतकऱ्यांना आवाहन केले आहे. 

उत्तर प्रदेशात नगदी पीक म्हणून उसाकडे शेतकऱ्यांचा मोठा ओढा आहे. २०१७-१८ च्या हंगामात येथे ऊस लागवड १२ टक्क्यांनी वाढून २०.५४ लाख हेक्टरवरून २३ लाख हेक्टरवर आली होती. त्यामुळे २०१७-१८ च्या हंगामात राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले. तसेच कारखान्यांकडे साखर पडून आहे. दर नसल्याने कारखाने निर्यात करण्यास किंवा विक्री करण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे पुढील गाळप हंगामात शेतकऱ्यांना ऊस लागवड न करण्याचे आवाहन खासगी साखर कारखाने करत आहेत. कारखाने शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी ऊस बेणे, कीटकनाशक आणि इतर कृषी निवष्ठा उधारीवर किंवा अनुदानावर देत होते त्याच भागात आता कारखान्यांनी ऊस विकास कार्यक्रम थांबविले आहेत.  

प्रत्येक साखर कारखाना ऊस विभागाने नेमून दिलेल्या १६ किलोमीटरच्या क्षेत्रात प्रत्येक वर्षी गाळापासाठी ऊस उपलब्ध व्हावा यासाठी ऊस विकास कार्यक्रम राबवत असत. आता खासगी साखर कारखाने तर थेट शेतकऱ्यांना बांधावर जाऊन, हस्तपत्रके वाटून आणि इतर माध्यमातून शेतकऱ्यांशी संपर्क साधत आहेत. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडील शेतकऱ्यांची देणी १२ हजार कोटींवर गेली आहेत. थकबाकी असलेले ४० टक्के कारखाने अद्यापही गाळप करत आहेत. 

जेव्हा येथील काही शेतकऱ्यांनी खासदार मेनका गांधी यांच्याकडे थकबाकीविषयी तक्रार केली तेव्हा त्यांनीही शेतकऱ्यांना ‘‘जर उसाला एवढा कमी दर मिळत असेल तर तुम्ही दुसरे पीक का घेत नाही. देशात साखरेचे उत्पादन जास्त झाल्यास मागणी कमी असल्याने दर पडणारच. त्याचा परिणाम ऊस दरावरही होणारच.’’ असे सांगितले होते.

कारखान्यांनी शेतकऱ्यांना वाटेलेल्या हस्तपत्रकांमध्ये शेकऱ्यांनी २०१८-१९ च्या हंगामात ऊस लागवड कमी करावी. त्यामुळे कारखान्याचे साखर उत्पादन कमी होईल आणि उसाची देणी देण्यासाठी लागणारा विलंब होणार नाही. शेतकऱ्यांनी जर कारखान्यांनी सांगितल्यानुसार लागवड कमी केली नाही, तर येणाऱ्या हंगामात साखरेचे उत्पादन वाढून दर पडतील, असेही म्हटले आहे.

अतिरिक्त उत्पादन 
देशात २.३० कोटी टन साखरेचा दरवर्षी वापर होतो. मात्र २०१७-१८ च्या हंगामात ३.२५ कोटी टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा देशात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त साखरपुरवठा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात मगील वर्षी ८० लाख टन साखर उत्पादन झाले होते. मात्र यंदा विक्रमी ऊस उत्पानामुळे साखर उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ होऊन १.१२ कोटी टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

थकबाकी वाढली
जास्त ऊस गाळपामुळे कारखान्यांकडील थकबाकी वाढली आहे. सध्या उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडी थकबाकी १२ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. कारखान्यांच्या सूत्रानुसार एक क्विंटल साखर उत्पादनासाठी ३७०० रुपये खर्च येतो. मात्र सध्या बाजारात साखरेचे दर २६०० ते २६५० रुपये प्रतिक्विंटलच्या मध्येच घुटमळत आहेत.

इतर पिके घ्या...
आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी यासाठी कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या मार्गदर्शिकेमध्ये काही सूचना केल्या आहेत. ‘‘ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात या हंगामात गहू पीक घेतले आहे. त्यांनी पुढील हंगामात उसाची लागवड न करता तूर, मूग आणि उडीद यांसारखी कडधान्ये पेरावी,’’ अशी सूचना केली आहे. तसेच ‘‘शेतकऱ्यांनी मान्यता नसलेल्या जातीच्या उसाची लागवड करू नये. शेतकऱ्यांनी असा ऊस पिकवल्यास कोणताही कारखाना तो खरेदी करणार नाही,’’ अशा सूचनाही साखर कारखान्यांनी केल्या आहेत.

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...