agrowon news in marathi, subhash deshmukh says, tur payment will be done within 15 days, Maharashtra | Agrowon

तूर खरेदीचे चुकारे येत्या पंधरा दिवसांत : सुभाष देशमुख
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 जुलै 2018

नागपूर ः राज्यात या वर्षी विक्रमी ३२ लाख क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे; परंतु काही शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. तुरीचे थकीत चुकारे येत्या पंधरा दिवसांत केले जातील, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. 

नागपूर ः राज्यात या वर्षी विक्रमी ३२ लाख क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे; परंतु काही शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. तुरीचे थकीत चुकारे येत्या पंधरा दिवसांत केले जातील, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तूर खरेदीसंदर्भाने लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना सहकारमंत्र्यांनी गेल्या हंगामात तुरीची उत्पादकता वाढण्यामागे जलयुक्‍त शिवार हे कारण असल्याचे सांगितले. जलयुक्‍त शिवारमुळे तुरीला संरक्षीत सिंचन करणे शक्‍य झाले तर काही ठिकाणी पिकाच्या मुळांना पाणी मिळाले. त्यामुळे उत्पादकता वाढीस लागली. त्यामुळे या वर्षी विक्रमी ३२ लाख क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते करण्यात आले आहेत; परंतु काही शेतकऱ्यांना अद्यापही चुकारे मिळाले नाहीत. येत्या पंधरा दिवसांत हे चुकारे केले जातील, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या कष्टाने 
वाढली उत्पादकता 

जलयुक्‍तमुळे तुरीची उत्पादकता वाढल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले. त्यावर आक्षेप घेत धनंजय मुंडे यांनी सरकारच्या मेहरबानीने नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टाने उत्पादकता वाढल्याचे सांगितले. चुकाऱ्याच्या मूळ प्रश्‍नाला बगल देण्याचा हा प्रयत्न असल्याने गोंदिया-भंडारा पोटनिवडणुकीप्रमाणे राज्यातही असेच परिणाम भोगावे लागतील, असा टोलाही मुंडे यांनी लगावला. 

खरेदीकरिता गोदामाची सोय नाही 
सरकारची तूर खरेदीची प्रामाणिक इच्छा आहे; परंतु साठवणुकीकरिता गोदाम नाहीत; त्यामुळे तूर खरेदी कमी करावी लागली. मागच्या सरकारने गोदाम बांधले असते तर जास्त तूर खरेदी केली असती, असे सहकारमंत्री म्हणाले. मात्र, २००१-२०१४ या कालावधीत एफसीआयने किती गोदाम देशात आणि महाराष्ट्रात बांधले याचे आकडेवारीच सभागृहासमोर ठेवण्याचे आवाहन या वेळी धनंजय मुंडे यांनी दिले.

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...