agrowon news in marathi, sudhir bokar won the laptop, Maharashtra | Agrowon

सुधीर बोरकर ठरले लॅपटॉपचे मानकरी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

पुणे : राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘अॅग्रोवन स्मार्ट अचिव्हर्स स्पर्धे’ला उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या निकालासाठी काढलेल्या सोडतीत भंडारा जिल्ह्यातील सुधीर हरिश्चंद्र बोरकर यांना पहिले बक्षीस मिळाले असून, ते लॅपटॉपचे मानकरी ठरले आहेत. 

पुणे : राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘अॅग्रोवन स्मार्ट अचिव्हर्स स्पर्धे’ला उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या निकालासाठी काढलेल्या सोडतीत भंडारा जिल्ह्यातील सुधीर हरिश्चंद्र बोरकर यांना पहिले बक्षीस मिळाले असून, ते लॅपटॉपचे मानकरी ठरले आहेत. 

‘अॅग्रोवन’ आयोजित आणि पृथ्वी अॅकॅडमी प्रायोजित या स्पर्धेत राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या उज्ज्वल भवितव्याचा शोध घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या दोन हजार पात्र प्रवेशिकांची सोडत ‘अॅग्रोवन’च्या पुणे कार्यालयात काढण्यात आली. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, पृथ्वी अॅकॅडमीचे संचालक विश्वनाथ पाटील, ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘अॅग्रोवन’चे मुख्य व्यवस्थापक (वितरण) चंद्रशेखर जोशी यांच्या उपस्थितीत १३ लाख रुपयांच्या बक्षिसांची सोडत काढण्यात आली. स्पर्धेत १६१२ बक्षिसे वाटली जात असून, प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील कूपन्स भरून प्रवेशिकांच्या माध्यमातून पाठविले होते. ‘ॲग्रोवन स्मार्ट अचिव्हर्स’ सोडत निकाल जाहीर होताच लॅपटॉपचे पहिले बक्षीस पटकवणाऱ्या सुधीर बोरकर (सेंदुरवाफा, ता. साकोली, जि. भंडारा) यांना दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली. श्री. बोरकर हे ग्रंथपाल असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. 

दुसरे बक्षीस टॅबलेटस्‌चे होते. एकूण पाच बक्षीसे, मानकरी असे.. 
   योगेश सीताराम जरारे, हट्टी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद, 
   संजीवनी सा. शेळके, नेकनूर, ता. जि. बीड 
   तुकाराम अमृता कांबळे, कागल, जि. कोल्हापूर, 
   आकाश सुरेश साठवणे, मुंडीकोटा, ता. तिरोडा, जि. गोंदिया 
   राजकिरण दलपतसिंग राजपूत, आढे, ता. शिरपूर, जि. धुळे

तिसरे बक्षीस स्मार्टफोन, एकूण सहा बक्षीसे, मानकरी असे...   
   शिवानी श्रीकृष्ण ढोरे, नांदुरा, जि. बुलडाणा 
   मंगेश विक्रम खेडकर, औरंगाबाद 
   कुंदन नंदकिशोर चौधरी, पिंपरूड, ता. यावल, जि. जळगाव 
   राघोबा बाबन म्हेत्री, मुगाव, ता. नायगाव, जि. नांदेड 
   विवेक शिवाजी चौधरी, आर्वी, ता. जि. धुळे 
   शीतल प्रदीप गांगुर्डे, वडनेर भैरव, ता. चांदवड, जि. नाशिक हे ठरले आहेत. 

चौथे बक्षीस म्हणून १०० जणांना एक हजार रुपये किमतीचे गिफ्ट मिळणार आहेत. पाचवे बक्षीस मिळालेल्या ५०० विद्यार्थ्यांना पृथ्वी प्रकाशनची एमपीएससी, यूपीएससीची एक हजार रुपये किमतीची पुस्तके मिळणार आहेत. याशिवाय एक हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांची पृथ्वी प्रकाशनची ''यशाची परिक्रमा'' मासिकाची वार्षिक वर्गणी दिली जाणार आहे. स्पर्धेतील उर्वरित १६०० बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे १० जुलैनंतर ‘अॅग्रोवन’मधून क्रमशः प्रसिद्ध केली जाणार आहेत. या सोडत सोहळ्याचे सूत्रसंचालन ‘अॅग्रोवन’चे वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) संभाजी घोरपडे यांनी तर आभार वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) विकास खैरनार यांनी मानले. 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...