agrowon news in marathi, sudhir mungantiwar says four crore tuti plantaion in state, Maharashtra | Agrowon

राज्यात तुतीची चार कोटी रोपे लागवडीचा संकल्प ः मुनगंटीवार
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

औरंगाबाद: वर्षानुवर्ष उत्पन्न देणारे झाड असले की त्याचे संगोपणही लोक काळजीने करतात. रेशीम उद्योगातील तुतीचे झाड त्यापैकीच एक. तुतीचे महत्त्व अधोरेखीत झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प घेऊन निघालेल्या शासनाने नियोजनातून चार कोटी तुतीची रोपं लावण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे, अशी माहिती राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

औरंगाबाद: वर्षानुवर्ष उत्पन्न देणारे झाड असले की त्याचे संगोपणही लोक काळजीने करतात. रेशीम उद्योगातील तुतीचे झाड त्यापैकीच एक. तुतीचे महत्त्व अधोरेखीत झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प घेऊन निघालेल्या शासनाने नियोजनातून चार कोटी तुतीची रोपं लावण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे, अशी माहिती राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

‘‘वनांमध्ये वाढ होण्यासाठी १ ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राज्यभरात राबविण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी पर्यावरणाचा सैनिक म्हणून वन सत्याग्रहात मिशन म्हणून सहभागी व्हावे’’, असे आवाहनही मंत्री मुनगंटीवार यांनी केले. भूमी आणि जल व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथील सभागृहात शुक्रवारी (ता. १५) औरंगाबाद विभागातील वृक्ष लागवड आणि संगोपन नियोजन व आढावा बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पत्रकार परिषदेनंतर वृक्षलागवड नियोजनासंदर्भात आढावा बैठकही घेण्यात आली.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, वृक्ष लागवड मोहिमेला जनतेने भरपूर प्रतिसाद दिल्याने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. कल्पवृक्ष बांबू विकासात राज्य अग्रणी झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानाला वनयुक्त शिवाराची जोड देऊन मृद, जलसंधारणाची कामे बळकट करण्यात येत आहेत. राज्यात वृक्षलागवडीसाठी पहिल्यांदाच इको बटालियन औरंगाबादेत स्थापन करण्यात आली आहे. मराठवाड्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तीन हजार ३३० किलोमीटर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागांतर्गत २०१८ मध्ये चार हजार ९१४ इतक्‍या कि. मी. रस्त्याच्या दुतर्फा २७ लाख १३ हजार वृक्षरोपांची लागवड करण्याचे नियोजन आहे.

‘‘१३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यासाठी २ कोटी ९१ लाख ७४ हजार वृक्षलागवडीचे लक्ष उद्दिष्ट आहे. हरित सेना नोंदणीमध्ये मराठवाड्याने ९२ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातील ८१ टक्के रोपांचे संगोपन करण्यात आले आहे. १९२६ या टोल फ्री क्रमांकावरून आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यावर कार्यवाहीदेखील करण्यात आल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

नागपूरमध्ये वृक्ष लागवडीसंदर्भात कमांड रूम उभारण्यात आली असून यामध्ये वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात इत्यंभूत माहिती मिळेल. माहेरच्या साडीच्या धर्तीवर 'झाडी' ही संकल्पना रूजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याअंतर्गत सासरी जाणाऱ्या मुलीला एक झाडाचं रोपट भेट दिलं जाईल. शेतकरी कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यास पाच फळांची व पाच इतर अशी दहा झाडं भेट दिली जाणार आहेत,’’ असेही मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

आढावा बैठकीत सुरवातीला विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी मराठवाड्यातील वृक्ष लागवड नियोजनाबाबत सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केली. यामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत माझी शाळा, माझी टेकडी, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, टेकडीसाठी संपर्क अधिकारी, तुती, फळबाग लागवड, बनांची निर्मिती, ग्रामनिहाय समिती, युवक, ज्ञान आणि ग्राम संकल्पना याबाबत सविस्तर माहितीचा समावेश होता. बैठकीचे प्रास्ताविक विकास खारगे यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...