agrowon news in marathi, sugar factories from uttar pradesh demanded additional subsidy, Maharashtra | Agrowon

उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त अनुदानाची मागणी
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि शेतकऱ्यांची वाढती थकबाकी यामुळे उत्तर प्रदेशातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी देता यावी यासाठी राज्य सरकारकडे अतिरिक्त अनुदानाची मागणी केली आहे. 

नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि शेतकऱ्यांची वाढती थकबाकी यामुळे उत्तर प्रदेशातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी देता यावी यासाठी राज्य सरकारकडे अतिरिक्त अनुदानाची मागणी केली आहे. 

केंद्र सरकार दरवर्षी उसाची एफआरपी ठरविते. मात्र उत्तर प्रदेश आणि काही राज्ये सरकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एफआरपीवर राज्य निर्धारित मूल्य जाहीर करून जास्त दर देते. ‘‘केंद्र सरकारने कारखान्यांकडील एफआरपी देण्यासाठी अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. परंतु उत्तर प्रदेशात राज्य निर्धारित मूल्य देण्यात येते. त्यामुळे ही रक्कम देण्यासाठी राज्य पातळीवर राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी कारखाने करत आहेत,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अलीकडेच केंद्र सरकारने चालू हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिक्विंटल ५.५ रुपये अनुदाने देऊन कारखान्यांकडील थकबाकी कमी करण्याचा प्रयत्न केला होता. देशात तसेच जागतिक पातळीवर यंदा विक्रमी ऊस उत्पादन झाल्याने कारखान्यांना दिलासा देण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशात सध्या साखरेचे दर हे प्रतिक्विंटल २६०० रुपयांवर खाली आले आहेत आणि एक क्विंटल साखर उत्पादनासाठी ३७०० रुपये खर्च येतो. 

कारखान्यांनी विकली २१४ कोटींची वीज
उत्तर प्रदेशातील २० साखर कारखान्यांनी उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडला २०१६-१७ या काळात २१४ कोटी रुपयांची अतिरिक्त तयार झालेली वीज विकली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी आज दिली. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील कथाऊली, टिटवी, बुधना, मानसुपूर, तिकोला आणि खैखेरी या सहा साखर कारखान्यांनी ७८ कोटी रुपयांची वीज तयार केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...